Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, July 2, 2026

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. पवार यांचा पोलीस पाटील संघटनेकडून सत्कार.. 


अक्कलकोट, दि. २ जुलै : - महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना, अक्कलकोट यांच्या वतीने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. पवार साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस सिद्धार्थ कोळी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष रहिमान अत्तार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महादेवी पाटील, वैशाली मोरे, सुप्रिया गायकवाड, दिपाली शिंदे, कोषाध्यक्ष संतोष बनसोडे, जिल्हा कार्यकारी सदस्य विजय बावकर व भिमंण्णा म्हेत्रे, प्रसिद्धीप्रमुख धानैय्या स्वामी उपस्थित होते. 


यावेळी कुरनूर पोलीस पाटील पोतदार, बोरी उमरगे पोलीस पाटील अंबण्णा अस्वले, जेऊर बीट प्रमुख सुरेश मैंदर्गी यांच्यासह तालुक्यातील अनेक पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सत्कार प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक श्री. पवार यांनी पोलीस पाटील हे गावपातळीवरील महत्त्वाचे घटक असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले. तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रहिमान अत्तार यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष बनसोडे यांनी मानले.




No comments:

Post a Comment