Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 26, 2023

संत रोहिदास विकास फांउडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार जाहीर

26 जानेवारी 2023 :
पुणे (प्रतिनिधी) :संत रोहिदास विकास फांउडेशनच्या  दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. 
पुणे येथे रविवार दि.29 जानेवारी 2023 ला पार पडत असलेल्या संत रोहिदास विकास फांउडेशन महाराष्ट्र राज्यच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून चर्मकार समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विकास फांउडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सुरेखाताई दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण बारा व्यक्तींना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये 1)सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. युवराज मोरे,
2)वेध फांउडेशन महाराष्ट्र राज्यच्या संस्थापक अध्यक्षा,अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा,विविध संस्था संघटनेच्या पदाधिकारी व पत्रकार सौ.रजनी शिंदे,3)सामाजिक कार्यकर्ते तथा सारा न्युज चे मुख्य संपादक सोलापूर शहर पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष रामचंद्र हुंडारे,
4)संत रोहिदास विकास फांउडेशनचे राज्य खजिनदार श्री.निवृत्ती दिघे,5)विजय चांदोरकर,6)सौ.रुपाली कारंडे,7)सौ.प्रणोती गभाले,8)सौ.सरिता पांडव,9)श्रीमती कमलाताई भोसले,10)कुमारी मोहिनी क्षीरसागर,11)श्री.संजय जाधव व12) सौ.सुवर्णा गाडेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले  आहे.कार्यक्रम रविवार दि.29 जानेवारी रोजी प्रियदर्शनी चक्रवर्ती सम्राट अशोक बुध्द विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,सिंहगड रोड वडगांव बु.येथे सकाळी 9 ते 5 यावेळेत होणार असल्याची माहिती संत रोहिदास विकास फांउडेशनचे राज्य सचिव श्री देवाप्पा शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment