सोलापूर:(प्रतिनिधी) सारा न्यूज नेटवर्क चॅनेलचे मुख्य संपादक राम हुंडारे यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या वतीने सोलापूर शहर अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी नियुक्ती केली.
दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली. राम हुंडारे यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील तसेच सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या पत्रकारीतेतून उपेक्षित समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून वंचित पिढीत घटकाला न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला.तसेच राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन राज्यसरकार कडे निवेदन पत्रव्यवहार व रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहे.यापुढे पत्रकारांवरील अन्याय विरुद्ध लढा देण्याचा संकल्प सोडला असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment