पंढरपूर:( प्रतिनिधी ) पंढरपूर शहरातील संत पेठ महात्मा फुले चौकात असलेल्या एका सार्वजनिक शौचालयामध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून हा नेमका प्रकार घातपात किंवा खून वा एखाद्या प्राण्याच्या भक्ष्य स्थानी पडला असा तर्क या परिसरात लावला जात आहे कृष्णा तम्मा धोत्रे वय वर्ष ७ काल रात्री आठ वाजता घरातून खेळण्याच्या निमित्ताने बाहेर पडला तो घरी न आल्याने घरातील लोकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री साडेबारा वाजता सुमारास कृष्णाचा मृतदेह सार्वजनिक शौचालयाच्या खोलीमध्ये पोट फाडलेल्या अवस्थेत व चेहऱ्यावर जखमा हाताला जखमा अशा आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांचा कयास आहे की हा अपघात घातपात नसून हा खूनच आहे एका लहान मुलाचा मृतदेह सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयात आढळून आल्याची वार्ता संत पेठ परिसरात पसरताच एकच गर्दी होऊन हळहळ व्यक्त होऊन तर्कवितर्क लढविले जात आहेत. कृष्णा याचे वडील हे मोलमजुरी गवंडी काम करत असून त्यांचा सात वर्षे मुलगा अत्यंत सुंदर देखना, चुणचुणीत असा होता त्याच्या या अवस्थेत मृतदेह आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे घटनास्थळी जाऊन मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवून देण्यात आला आहे. पोलीस जरी त्यांच्या पद्धतीने तपास करीत असले तरी ज्या अवस्थेत या सात वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात तर्क वितर्क लढवले जात असून याची सखोलपणे चौकशी करून ज्या कोणी निर्दयपणे या लहान बालकाला मारून सार्वजनिक अशा शौचालयाच्या ठिकाणी टाकून देण्यात आले आहे हा प्रकार अत्यंत निंदनीय असून ज्यांनी त्याचा मृतदेह पाहिला आहे ते सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.अशा सात वर्षीय लहान निरागस बालकाचा अमानुषपणे पोट फाडून शरीरावर इतर जखमा करून अशा ठिकाणी टाकून अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला आहे यामागचे नेमके गुढ काय आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होणार की गुलदस्त्यात राहणार अशी चर्चा या परिसरात चालू आहे
No comments:
Post a Comment