Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, January 8, 2023

संघर्ष योद्धा यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त जंगी सत्कार अनेक मान्यवरांची हजेरी शुभेच्छांचा वर्षाव

 सोलापूर (प्रतिनिधी ) 6 जानेवारी पत्रकार दिन त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा देखील वाढदिवस  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशवंत पवार यांचा जन्म झाला की काय? असा प्रश्न निर्माण होत असून गेली अनेक अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता  यशवंत पवार यांनी जीवाचे रान करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती स्थापना केली असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  राज्यातील सर्वच माध्यमांच्या पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता पत्रकारावर दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याची न्यायालयीन चौकशी कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव मदत त्याच बरोबर वारसाला शासकीय सेवेत समावेश  राज्यातील पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन उपोषण निवेदन पत्र व्यवहार करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा 6 जानेवारी पत्रकार दिनी  वाढदिवस असल्याने सोलापूर येथे समाज कल्याण केंद्र या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालीब मुजावर दैनिक लोकप्रधानचे कार्यकारी संपादक अस्लम शेख  सुप्रसिद्ध वकील दिलीप जगताप ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याचे सुप्रसिद्ध गायक गवळी  यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन व मोठा हार गळ्यात घालून जंगी सत्कार करण्यात आला.

    त्याचबरोबर त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार संघटक बाळकृष्ण सदाफुले कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा समन्व्यक वैजिनाथ बिराजदार जिल्हा प्रसिद्ध प्रमुख नागनाथ गणपा  शहराध्यक्ष राम हुंडारे महिला विभाग शहराध्यक्ष डॉ अलका सोरटे शहर समन्वयक श्रीकांत कोळी शहर कार्याध्यक्ष आदर्श धडे शहर प्रसिद्धी प्रमुख तथा दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सह राहुल जाधव विजय चव्हाण युनूस अत्तार राजाभाऊ पवार सोमनाथ मुंजे चंद्रशेखर निमल अ सत्तार डोंगरी जेष्ठ पत्रकार उमाकांत (बाबा )काशीद भागप्पा प्रसन्न बार्शी येथील महिला पत्रकार उज्वला झाडे अरुण सिडगिद्दी सिद्धार्थ भडकुंबे  डॉ कीर्तीपाल गायकवाड  संतोष म्हेत्रे मोहंमद इंडिकर संदीप चव्हाण युसूफ शेख डॉ रवींद्र सोरटे साजिद तांबोळी खालिद सय्यद मुर्त्यूज शेख अनिल कोकाटे अब्दुल वाहिद रवी पवार सह अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होते  सोलापूर येथील समाज कल्याण हॉल वाढदिवसाच्या निमित्ताने तुडुंब भरला होता  यावेळी अनेक मान्यवरांनी  पत्रकारांच्या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी करत असलेल्या कामाबाबत कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






No comments:

Post a Comment