Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 9, 2023

संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्ष पदी राम हुंडारे यांची निवड

    जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्यावतीने संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने सात रस्ता संगमेश्वर कॉलेज सोलापूर या ठिकाणी साजरी केली जाते. संस्थेचे सहा वे वर्ष आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी संत रोहिदास महाराज मध्यवर्ती उत्सव समिती पदाधिकारी यांची निवड जी के  संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह सात रस्ता येथे चर्मकार समाजबांधव व इतर समाज बांधव व पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.



 या बैठकीत मध्यवर्ती उत्सव समिती शहर अध्यक्षपदी राम हुंडारे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी सुरज आखाडे, उत्सव कार्याध्यक्षपदी वैजिनाथ बिराजदार, उत्सव समिती कार्यवाहक सुरज लांबतुरे, जी के संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पवार, प्रसिद्धीप्रमुख महेश उंबरगीकर, उत्सव समितीस्वागत अध्यक्ष इराप्पा वनकोसे  व विष्णू कांबळे व उत्सव समिती संघटक गणेश बोमणे, उत्सव समिती संघटक राहुल निम्मल, समिती संघटक विजयकुमार चव्हाण, संघटक संदीप चव्हाण, उत्सव समिती संघटक नागनाथ गणपा, संघटक मानव सोनवणे, संघटक सादिक शेख, यशोदीप न्यूज चैनल चे उपसंपादक देवेंद्र औवटी, यशोदीप न्यूज चैनल वरिष्ठ उपसंपादक भागप्पा प्रसन्न, यशोदीप शहर प्रतिनिधी रमेश सुतार आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment