Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 19, 2023

*सोलापूर गड्डा यात्रा :- सोलापुरात धारदार शस्त्राने भोसकून परप्रांतीय युवकाचा खून; गड्डा यात्रेत खळबळ*


January 19, 2023
सोलापूरच्या गड्डा यात्रेत दोन गटात वाद; पैश्याच्या देवाण – घेवाणवरून एकाचा खून 
सोलापूर : दोन गटात झालेल्या वादातून एका बाहेर राज्यातील कामगाराचा धारधार हत्याराने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी (ता. 19) दुपारी घडली आहे. हा प्रकार पैशावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत बिहारी तर आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती आहे. 

शहरात ग्रामदैवत श्री सिध्देश्वरात मंदिर परिसरात यात्रा भरलेली आहे. या यात्रेत शेकडो व्यावसायिकांचे स्टॉल लागलेले आहेत. आज दुपारी दोन गटात झालेल्या वादातून एका तरूणाचा खूनाची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच सदर बाझारचे पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर व अन्य वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनेनंतर आरोपीने पळ काढल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.
या यात्रेत आठ हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून काही नागरिक आणि पीडित यांच्यात वादादवादी झाली. या वादावादीचे हाणामारीत पर्यावसन झाल्याचे प्रथमदर्शनी लोकानी सांगितले. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गड्डा यात्रेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मार्केट पोलीस चौकीच्या समोरील बाजूस दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी तिघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. शहरातील मार्केट पोलीस चौकीसमोरच ही घटना घडली. मयत बिहारी तर आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत. आरोपीचे नाव आतिफ अख्तर शहा (रा. जि. कैमुर रा. बिहार) असे आहे.
मयत तरुणाचा मृतेदह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सर्व पीडित आणि जखमी मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी पुढील तपास करत असून याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment