तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ... !
महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांनी केली आरती.!
महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे बाराबंदीत..!
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने पुष्पवृष्टी.. !
बाल गोपाळांचाही बाराबंदीत उत्साहात सहभाग...!
यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू , मनोज हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू , शिवानंद हिरेहब्बू आणि जगदीश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींच्या हस्ते श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन तसेच मानाचे पहिल्या आणि दुसर्या नंदीध्वजाचे पूजन यावेळी मोठ्या मंगलमय वातावरणात आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर आरती करून करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी मनोभावे आरती केली.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,
आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी नगरसेवक अमोल शिंदे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे , काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, केदार उंबरजे, महापालिका आयुक्त शितल तेली - उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापालिका उपायुक्त विद्या पोळ, पोलीस उपायुक्त संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वपोनि उदयसिंह पाटील, बार असोसिएशनचे राज्य अध्यक्ष मिलिंद थोबडे, माजी आमदार शिवशरण बिराजदार, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, काँग्रेसचे सुशील बंदपट्टे, अंबादास गुत्तीकोंडा, राहुल वर्धा, तिरुपती परकीपडला, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, विजय पुकाळे, हेमा चिंचोळकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
No comments:
Post a Comment