Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, January 31, 2023

संत रोहिदास विकास फाऊंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन पुणे येथे उत्साहात संपन्न


31 जानेवारी 2023 
पुणे: (प्रतिनिधी) संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज अखंड चर्मकार समाजाचे प्रेरणास्थान आहे, संत रोहिदास महाराज यांना अभिप्रित असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्याचा वसा घेऊन महाराष्ट्र राज्य मध्ये संत रोहिदास विकास फाऊंडेशन संस्थापक अध्यक्षा मा. सौ. सुरेखाताई दिघे याच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशन कार्यरत आहे. संत रोहिदास विकास फाऊंडेशन संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्मकार समाज बांधवाच्या न्याय हक्क, रोजगार, व्यवसाय, नोकरी आणि समाज प्रबोधन यासारख्या कामामध्ये हातभार लावत आहे,
संत रोहिदास विकास फाऊंडेशनचा दुसरा वर्धापन रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. 
वर्धापन दिनी संत रोहिदास विकास फाऊंडेशन मार्फत समाजामध्ये समाज  कार्य करणाऱ्या समाजबांधवाना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे, तसेच फाऊंडेशनमधील नवनिर्वाचित पदाधिकारी यांस नियुक्ती पत्र वितरण करण्यात आले व समाजरत्न पुरस्कार महराष्ट्रातील १२ जणांना प्रदान करण्यात आले त्यामध्ये 
१) श्री. युवराज बळीराम मोरे (हिरकणी न्यूजचे उपसंपादक) २) श्री. रामचंद्र भिमाजीं  हुंडारे(सारा नेटवर्क न्यूजचे मुख्य संपादक ) ३) श्रीमती कमल विष्णू भोसले  ४) श्री संजय धोंडीबा जाधव  ५) श्री. निवृत्ती किसन दिघे ६) सौ. रजनी मुरलीधर शिंदे  ७) सौ. रूपाली नारायण कारंडे ८) कु. मोहिनी प्रभाकर क्षीरसागर ९) सौ. सुवर्णा संतोष गाडेकर १०) सौ. सरिता जोतिबा पांडव  ११) कु. विजय रामचंद्र चांदोरकर १२) सौ. प्रनोती समीर गभाले  यांच्या सामाजिक , शैक्षणिक तसेच साहित्यिक श्रेत्रातील कार्याबद्दल संत रोहिदास विकास फाऊंडेशने त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौवरण्यात आले.
तसेच वर्धापन दिनी संत रोहिदास महाराज, व्यवसाय, रोजगार याविषयी विशेष  प्रबोधन / मार्गदर्शन डॉ. संजू भटकर साहेब, श्री. धनराज मोतीराय साहेब, सौ. रुपालीताई टिके, श्री. अर्जुन धुमाळे साहेब, श्री. विजय चांदोरकर साहेब ,श्री. केवल वाघमारे साहेब व सौ. रुपालीताई कारंडे यांच्या माध्यमातून झाले,  
द्वितीय वर्धापन दिनाचे सूत्रसंचालन श्री. राजेश नांदवीकर साहेब यांनी केले. 
द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यासाठी संत रोहिदास विकास फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे हातभार लागले आहे, विशेष करून संस्थापक अध्यक्षा - सौ. सुरेखाताई दिघे, महाराष्ट्र राज्य सचिव श्रे. देवप्पा शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्य महिला सचिव सौ. रुपालीताई टिके, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ, श्री. संजू भटकर साहेब, महाराष्ट्र राज्य सहसल्लागार श्री. राजेश नांदवीकर साहेब, निवड कमिटी प्रमुख श्री. अर्जुन धुमाळे साहेब, महाराष्ट्र राज्य खजिनदार श्री. निवृत्ती दिघे साहेब यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यात  योगदान लाभले.

No comments:

Post a Comment