Sara news Network
शुक्रवार, २० जानेवारी २०२३
सोलापूर - (प्रतिनिधी) १) रणजीत मारुती मोरे, वय ३७ वर्षे पद मंडळ अधिकारी, तहसिल पंढरपूर, २) खाजगी इसम शरद रामचंद्र मोरे वय ३७ वर्षे, व्यवसाय शेती, रा. तुंगत ता. पंढरपूर जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे १,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले.
थोडक्यात माहिती यातील वर नमुद आरोपी लोकसेवक व आरोपी खाजगी इसम यांनी मुरुम उत्खननाबाबत तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेला जेसीबी दि. १५.०१.२०२३ रोजी ताब्यात घेवून, तक्रारदार यांच्या टीपर ट्रक मधुन चोरीच्या मुरुमची वाहतुक झाली असल्याबाबत सांगुन त्यावरुन तक्रारदार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी अथवा कोणताही दंड न आकारता ताब्यात असलेला जेसीबी सोडण्यासाठी १,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारली असता नमुद आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, एसीबी पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे, गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, एसीबी सोलापूर. सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार पोहवा / सोनवणे, पोना / प्रमोद पकाले, पोना/ अतुल घाडगे, पोकॉ/ स्वप्नील सन्नके, व चालक शाम सुरवसे सर्व नेम. एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment