सोलापूर : महापालिका आवारातील सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ११० वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाचे काम किरकोळ कामे वगळता जवळपास पूर्ण झाले आहे. गतवैभव प्राप्त झालेल्या दिमाखदार इंद्रभुवन इमारत प्रजासत्ताक दिनापासून म्हणजे २६ जानेवारी नागरिकांना पाहण्यासाठी होणार खुली होणार आहे. या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. ११० वर्षांच्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूचे जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या ५ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येत आहे. साधारणतः गेल्या दहा महिन्यापासून हे इमारत नूतनीकरणाचे काम संरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत सुरू आहे. कंजर्वेशन आर्किटेक्चर मुनिश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० कारागीर यासाठी परिश्रम घेत आहेत. हे नूतनीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. बाहेरील बाहेरील पोर्च मधील किरकोळ कामे आता हाती घेण्यात आली असून इतर सर्व कामे पूर्ण झाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठीची अंतर्गत फर्निचर व इतर कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यानंतर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरित करण्यात येतील. या इंद्रभुवन इमारतीत महापालिका आयुक्त, 2 अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त यांची कार्यालय राहणार आहेत तर खाली कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. दुसऱ्या मजल्यावर आयुक्तांचे कार्यालय या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्व इतिहास असलेले छायाचित्रही लावण्यात येणार आहेत तसेच पहिल्या मजलावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय असेल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कारागिरांनी या इमारतीला गत सौंदर्य प्राप्त करून दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी दिली.
No comments:
Post a Comment