27 जानेवारी 2023 :
सोलापूर (प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी कर्देहाळी शिर्पणहळी वडगाव तसेच दर्गनहळी परिसरात गेली अनेक दिवसापासून बेकायदेशीररित्या महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवून कोणतीही परवानगी न घेता मोठया प्रमाणात मुरूम व माती उपसा करून त्याची राजेरोस पणे वाहतूक केली जात असून अश्या बेकायदेशीर माती मरूम उपसा करण्यास संमती देणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या भागातील बेकायदेशीर माती व मुरूम उपसामुळे राज्य सरकार चा लाखों रुपयांचा महसूल बुडत असून सदर चा प्रकार मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगणमताने होत असून याबाबत मोठा आर्थिक व्यवहार होत असून या प्रकरणी तहसीलदार दक्षिण कोणतीही कारवाई करत नाहीत या भागातील बेकायदेशीर माती व मुरूम उपसा बाबत जबाबदार असणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे
No comments:
Post a Comment