Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 4, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर पोलीस उपायुक्तासह दोघांना ट्रकने ठोकरले 

बसवनगर जवळ सायकलिंग करतानाची घटना.....


दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर- विजयपूर महामार्गावरून सायकलिंग करणारे राज्य गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तासह दोघांना ट्रकने जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले.तेरा माइल   बसवनगर जवळ हा अपघात झाला.   मंद्रूप पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त नागनाथ गायकवाड व सोमनाथ पटणे दोघेही राहणार जुळे सोलापूर असे जखमींची नावे आहेत. पटणे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तर उपायुक्त गायकवाड हे देखील जखमी झाले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, सोलापुरातील पोलीस उपायुक्त नागनाथ गायकवाड तसेच डॉ. अशोक राठोड, डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, सोमनाथ पटणे, दादाराव इंगळे, सुनील कोकाटे यांचा सायकलींगचा ग्रुप आहे. त्यामुळे हे गेल्या रविवारी  सर्वजण सोलापूर -विजयपूर महामार्गावरून सोलापूर ते टाकळी पर्यंत पहाटे साडेपाच वाजता सायकलिंग करत गेले होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास परत सोलापूरला येताना नांदणी येथील टोल नाक्याच्या पुढे आले. तेव्हा डॉ. राठोड व डॉ. क्षीरसागर सर्वांच्या पुढे होते. तर त्यांच्या पाठीमागे चारजण होते. रिलायन्स पंपाजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (KA-28-D 0836) याने सायकलस्वारांना जोराची धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन या ट्रकने 13 माइल  जवळ एका क्रुझर जीपला (MH-13 CK  2803) यालाही धडक दिली. या अपघातात पोलीस उपायुक्त गायकवाड व त्यांचे सहकारी पटणे हे जखमी झाले. पटणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आपल्या सहकाऱ्यांना ट्रकने ठोकरल्याचे डॉ. राठोड व क्षिरसागर यांनी पाहिले. त्यांनी लगेच महामार्गावरील ॲम्बुलन्स बोलावून दोन्ही जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठविले. 

मंद्रुप पोलिसांनी या प्रकरणी ट्रक ताब्यात घेतला असून अधिक तपास  करीत आहेत.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment