सारा न्यूज नेटवर्क -
मराठा आरक्षण विरोधी वाचाळ नेत्यांना जोडो मार आंदोलन
सोलापूर(प्रतिनिधी) :- मराठा समाज आरक्षणासाठी गेल्या तेरा दिवसांमध्ये २५ ते २७ जणांनी आत्महत्या केली, पण भावनाशून्य व निर्दयी सरकारला याचे गांभीर्य नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संघर्ष नायक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेली टीका सहन न झाल्याने त्यांचे लाळघोटे कार्यकर्ते बिळातून बाहेर येऊन जरांगे-पाटील व मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत, हे मराठा समाज कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा मराठा समन्वयक प्रशांत बाबर यांनी दिला.
जुळे सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने विजापूर रोडवरील अशोक नगर येथील चौकात गुरुवारी सकाळी मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य करणाऱ्या वाचाळ वरांना स्वीटी कुसेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या हस्ते पायताणाने चोप देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या आरक्षण विरोधी भूमिका अन् त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना मराठा समन्वयक प्रशांत बाबर बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळलेल्या कार्यकर्त्यांना वेळीच समज द्यावी, अन्यथा मराठा समाज ते वाचाळवीर दिसतील, तिथे मराठा स्टाईलने समजवतील, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे मत प्रशांत बाबर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी प्रशांत बाबर, मानाजी माने, चेतन चौधरी, सुशांत वाकचौरे, महेश घाडगे, रवी मोहिते, श्रीकांत मेळगे-पाटील, विकास कदम, पोपट भोसले, राजाभाऊ कुसेकर, संकल्प जगदाळे, नरेश घोरपडे, सिताराम बाबर, किरण माने, राहुल पाटील, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, लता ढेरे, लक्ष्मी माने, स्वीटी कुसेकर, रोहित तळवळकर, सचिन गोडसे, शशिकांत शिंदे, प्रविण शिंदे, दत्ता जाधव, शाम कदम आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment