Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 23, 2024

भीम महोत्सव-२०२४ थाटात संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

भीम महोत्सव-२०२४ थाटात संपन्न...

सोलापूर(प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त, भारतीय समाज सेवा संघ, सोलापूर या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने, या वर्षी पाहिल्यांदाच दोन दिवसीय भीम महोत्सवाचे आयोजन केले होते. 

       या दोन दिवसीय भीम महोत्सवान्तर्गत, ड्रीम पलेस, पोलिस कल्याण केंद, सेवासदन शाळेसमोर, सरस्वती चौक, सोलापूर येथे, दि.१९.४.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, भंते सारीपुत्त यांच्या हस्ते 'भीम बाजार'चे उदघाटन झाले. या वेळी मंचकावर यु.एफ़्.जानराव, शाहीर रमेश खाडे, कांबळे सर, डॉ. संभाजी मस्के, कृष्णा मेरगु, कडादी, खरटमल, लोंढे, उबाळे, संतोष क्षीरसागर, यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या या बाजारात २५ व्यवसायिकांनी सहभाग नोंदवला.

       दुसरे दिवशी, दि.२०.४.२०२४ रोजी सायंकाळी, हैद्राबाद येथील चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यनारायण जाधव, मुंबईचे उद्योगपती सुनील व स्नेहा कांबळे, बहुजन विचार मंचचे अध्यक्ष आबासाहेब साबळे, शाहीर रमेश खाडे, नाट्य कलावंत मिलिंद ताकपेरे, संयोजक जयकर ठोंबरे सर, आदर्श शिक्षक राम गायकवाड सर, स्नेहपुष्प मित्र मंडळाचे सचिव कपिल भालेराव आदि मान्यवरांचे तसेच, पुरस्कारप्राप्त सिद्धाराम चाबुकस्वार यांचे प्रतिनिधी संकेत चाबुकस्वार व प्रमिलाताई उबाळे यांचे उपस्थितीत, सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप् प्रज्वलन करुन, सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. 

यानंतर संयोजक जयकर ठोंबरे सर यांनी प्रास्ताविक करुन, मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले.

     या नंतरच्या सांस्कृतीक कार्यक्रमात, डॉ. मुरुमकर यांच्या बहारदार निवेदनात, अरुण कसबे यांचे बुद्धगीत, राजेश उडानशिव यांचे बासरीवादन तसेच, राजू गायकवाड, शंकर बनसोडे, संजय गायकवाड, प्रज्ञा ननवरे, स्नेहा कसबे, संस्कृती ननवरे यांची भीमगीते आणि साजील ठोंबरे, सोहेल मुल्ला, हिमानी पाटील, गायत्री तेरकर यांचे नृत्य सादरीकरण, असा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान श्रीमती प्रमिलाताई उबाळे (संस्थापिका, प्रेरणा सेवाभावी संस्था, सोलापूर) यांना भीमकन्या तर, श्री. सिद्धाराम चाबुकस्वार (संयोजक, दलित चेंबर ऑफ़ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तथा, यशस्वी उद्योजकीय प्रेरक मार्गदर्शक, सोलापूर) यांना भीमरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. समारोप सत्रातील या सांस्कृतिक कार्यक्रमात व पुरस्कार वितरण सोहळ्यात, सर्वच मान्यवरांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. 

         या दोन दिवसीय भीम महोत्सवान्तर्गत आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी, भारतीय समाज सेवा संघाच्या सर्व पदाधिकऱ्यांनी सहकार्य केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



1 comment: