Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, August 19, 2024

मंद्रुप हद्दीत अवैध व्यवसायिकांची गय केली जाणार नाही स.पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचा इशारा;

 सारा न्यूज नेटवर्क - 

मंद्रुप हद्दीत अवैध व्यवसायिकांची गय केली जाणार नाही स.पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचा इशारा;

मंद्रूप हद्दीत राखणार कायदा सुव्यवस्था..

सोलापूर (प्रतिनिधी ) :- मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवून या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मंद्रूपचे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांची बदली सातारा जिल्ह्यात झाली असून, त्यांच्या जागी पवार यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे उपस्थित होते. पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी मनोज पवार यांचा सत्कार केला.

रोडरोमिओंवर कारवाई करणार

मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करू. आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय चालू देणार नाही. कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या तसेच महिला व मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना आपण ठोकून काढणार असल्याचा इशारा यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिला. सत्याची बाजू असणाऱ्या गोरगरीब जनता, शेतकरी, महिलांसह सर्व घटकांना न्याय मिळेल. सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार, अशी ग्वाही मनोज पवार यांनी दिली

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार म्हणाले, आपण फलटण येथील असून, यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी भागात काम केले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण येथेही सेवा बजावली. वेल्हे पोलिस ठाणे येथे एका संवेदनशील प्रकरणात तातडीने तपास करून गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने केल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तपासासाठी दिले जाणारे २०२२ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदक तसेच महाराष्ट्र पोलिस महासंचालकांकडून पदक मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अकलूज, बी.डी.एस. पथकात सेवा बजावली आहे. त्याच बरोबर वेल्हे येथे कार्यरत असताना त्यांच्या प्रयत्नातून सर्वात सुंदर आणि सोयीसुविधांनी युक्त पोलीस स्टेशनची इमारत बांधली गेली.

प्रास्ताविक पत्रकार अमोगसिद्ध लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार अभिजित जवळकोटे यांनी केले तर आभार पत्रकार श्रीकांत हाले यांनी मानले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment