सारा न्यूज नेटवर्क -
माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशन-२०२४ उत्साहात संपन्न;
माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लाभले मार्गदर्शन..
अहमदनगर (प्रतिनिधी) :- १८ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाचे 'अधिवेशन २०२४' राळेगण सिद्धी, जि. अहमदनगर येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सदर अधिवेशनामध्ये माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व समाजसेवक मा.श्री.अण्णा हजारे साहेब यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळाले. हे अधिवेशन अण्णा हजारे यांच्या मुळगावी राळेगण सिद्धी येथे संपन्न झाले.
सदर कार्यक्रमास शनिवारी, दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रिपासून राज्यातून शेकडो कार्यकर्ते मुक्कामी आले होते. महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगांव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, मुंबई, ठाणे, पुणे व पनवेल येथून असंख्ये कार्यकर्ते या अधिवेशन कार्यक्रमात शामिल झाले होते.
महाराष्ट्रामध्ये जागरुक नागरिक 'माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन' हि एकमेव सर्वांत मोठी संघटना असून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वात या अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन करताना विविध छटा.
या अधिवेशनासाठी सोलापूर मधुन प.महाराष्ट्र अध्यक्ष संजय किनीकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सूळ, सरचिटणीस बाळकृष्ण सदाफुले, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा संघटक दत्तात्रय पवार, शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन माहिती अधिकारी कार्यकर्त्यांना लाभले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानीय समाजसेवक अण्णा हजारे साहेब व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. सदर अधिवेशनात राज्यातून शेकडोंच्या संख्येने माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment