Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, August 2, 2024

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मनपा हेडक्वॉर्टर शाळेत क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने 1004 वह्यांचे वाटप; 

माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांची प्रमुख उपस्थिती

 सोलापूर(प्रतिनिधी) दि:-02 ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर,मनपा उर्दू शाळा हेडक्वॉर्टर, मनपा तेलगू शाळा क्रमांक-04 या शाळांमध्ये क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने 1004 वह्यांचे वाटप करण्यात आले.


        सदरील कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार मा.नरसय्या आडम मास्तर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मा.आडम मास्तर म्हणाले की, सोलापूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक  उभारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. तसेच मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर येथील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचे त्यांनी कौतुक केले.सामाजिक कार्यकर्ते श्री.लखन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना मनपा मराठी शाळा हेडक्वार्टर येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे व संस्काराचे खूप कौतुक केले. सहशिक्षिका प्रांजली तरंगे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंविषयी मनोगत व्यक्त केले  

       सदर कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे, पोलीस उपनिरीक्षक श्री. मोरे,ॲडव्होकेट श्वेता वाघमारे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  श्री.आदर्श(भैय्या)धडे, माजी सरपंच श्री सुरेश कसबे व क्रांतीसुर्य संघटनेचे पदाधिकारी,विद्यार्थी,पालक व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील राजश्री पतंगे,दयानंद गायगवळी,जगदेवी तोडकरी यांचे सहकार्य लाभले. 

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता जाधव, सूत्रसंचालन शिरीन शेख तर आभार प्रदर्शन सोमनाथ सोनलकर यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment