सारा न्यूज नेटवर्क -
नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट..
दिले व्यायामशाळा कामासाठी 10 लाख निधीच्या मागणीचे निवेदन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन सदिच्छा भेट घेण्यात आली व विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच केगाव येथील व्यायामशाळा कामासाठी 10 लाखाची निधीची मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात प्रामुख्याने केगाव येथे व्यायामशाळा बांधने व त्या पूरक व्यायामशाळा मधील साहित्य खरेदी करणे इ. कामा बाबत सविस्तर चर्चा करुन निधी उपलब्ध करण्या बाबत विनंती करण्यात आली.
या प्रसंगी जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, सदस्य रतनताई हुंडारे, जीके संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पवार, जीके संस्थेचे कार्याध्यक्ष महेश उंबरगीकर, जीके संस्थेचे सदस्य दत्तात्रय कोळी इ. उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment