Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, August 6, 2024

सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांची राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट;

 


सारा न्यूज नेटवर्क -

 सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांची राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट;

दिले "एक राखी पोलिस बांधवांसाठी" चे निमंत्रण..

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची पोलीस आयुक्तालय सोलापूर येथे राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना सोलापुरातील यशस्वी कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 या वेळी त्यांना "एक राखी पोलिस बांधवांसाठी" हा उपक्रम सोलापूरमध्ये राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणार आहे. त्याबाबत आयुक्त साहेबांशी  सविस्तर चर्चा करण्यात आली. "एक राखी पोलिस बांधवांसाठी" हा कार्यक्रम राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन राखी पोर्णिमा निमित्त पोलिस आयुक्त कार्यालय व सोलापुरातील पोलिस ठाण्यात साजरा करणार आहे. हे ऐकून पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक.. 

राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशनच्या वतीने आज पर्यंत करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती पोलिस आयुक्तांना संस्थापक अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांनी सांगितली व त्या उपक्रमाचे फोटोही दाखवण्यात आले. या सर्व सामाजिक उपक्रमाचे पोलिस आयुक्तांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 


आयुक्त कार्यालयात "एक राखी पोलिस बांधवांसाठी" या रक्षाबंधन उत्साहात सहभागी होण्यासाठी पोलिस आयुक्तांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले. 

यावेळी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रांजली मोहीकर, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा प्रेमचंद मेने, विश्वस्त सदस्य सौ ज्योती मेने, गीता हुंडारे, वेदांत मोहीकर,अनिश मोहीकर उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment