सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोहमार्ग पोलीसांनी वाचविले रेल्वे प्रवाशाचे प्राण..
सोलापूर (प्रतिनिधी) :- या मध्ये हकिकत अशी की, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडेस नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार हे सोलापुर रेल्वे स्टेशन येथे बदलापूर येथे झालेल्या पोलीसांवरील दगडफेकीच्या अनुषगांने बंदोबस्तकामी हजर असताना सांयकाळी ०६:०० वा. सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफार्म नं. ०१ वर आलेली भुवनेश्वर ते मुंबई गाडी न ११०२० कोणार्क एक्सप्रेस ही सोलापूर रेल्वे स्टेशन येथे थांबुन जात असताना नमुद गाडीचे पाठीमागील जनरल बोगीत एक प्रवाशी नामे मनोज कांबळे वय ३२ वर्षे राह. करमाळा जि. सोलापूर हा गाडीत चढत असताना त्याचे पाय घसरून खाली पडत असताना त्यास तात्काळ स्टेशनवर बंदोबस्तकामी असलेले पोलीस अंमलदार यांनी लागलीच ओढून त्यास सुरक्षित बाहेर काढले व त्याचे प्राण वाचविले.
सदर वेळी नमुद गाडीचे गार्ड यांनीही घटनेचे गांभिर्य पाहून तात्काळ गाडी इमर्जन्सी ब्रेक मारून थांबविली. तरी सदर प्रवाशी यांस बाहेर काढल्यानंतर त्याने पोलीसांचे आभार मानले. पुन्हा रेल्वे पोलीसांनी त्या प्रवाशास धिर देवून रेल्वे गाडीत बसवून सुखरूप पाठवून दिले.
सदरच्या मदतीमध्ये सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. एम जे गुरव, पोलीस उप निरीक्षक श्री. संजय जाधव, सपोफौ प्रकाश कांबळे, पो हवा साबीर जरतार, पो हवा परमेश्वर खरात, पो हवा प्रमोद सुरवसे, पो कॉ नंदकुमार राठोड, पो कॉ संदिप राठोड, म. पो कॉ रूपाली सोलंकर यांनी नमुद प्रवाशाचे प्राण वाचविण्यात मोलाची कामगरी केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment