सारा न्यूज नेटवर्क -
देशभरात शैक्षणिक गरजापूर्तीसाठी मदत करणार - तेलंगणाचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धूरेड्डी कंदकटला यांची ग्वाही..
तेलगू अभिनेता इंद्रसेना बुद्धम यांची उपस्थिती..
सोलापूर (प्रतिनिधी) :- आपल्या देशात आजदेखील शिक्षण क्षेत्रात विदारक अवस्था दिसून येते. हे लक्षात घेऊन माझ्यापरीने शैक्षणिक गरजापूर्तीसाठी मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. केवळ तेलंगाणा, महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशात हे काम करण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही तेलंगाणा मधील प्रख्यात उद्योजक व समाजसेवक सिद्धूरेड्डी कंदकटला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ येथील वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलला शैक्षणिक साहित्य देण्यासाठी सिद्धरेड्डी कंदिकटला आणि त्यांच्या सोबत तेलगू अभिनेता इंद्रसेना बुद्धम हे शुक्रवारी सोलापूरला आले होते.
मोहोळ येथील वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कुल, येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व प्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारलेली कलाकृतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. सिद्धूरेड्डी कंदकटला व तेलुगू चित्रपट अभिनेते इंद्रसेना बुद्धम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी इको नेचर क्लबचे पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर यांनी सहकार्य केले.
सोलापूरसाठी प्रवासी विमानसेवा गरजेची..
सोलापूरमधील टेक्स्टाईल उद्योगाबाबत मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. येथील टॉवेलची, कृषी मालाची निर्यात होते. टेक्सटाईल, शेती उद्योगासह अन्य उद्योगांच्या विकासासाठी सोलापुरात प्रवासी विमान सेवा असणे गरजेचे आहे असे मतही सिद्धूरेड्डी कंदकटला यांनी व्यक्त केले..
यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गोरगरीब लोक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मी काही वर्षांपासून शैक्षणिक गरजा पुर्तीचे काम करीत आहे. या अंतर्गत हैदराबाद येथे एक कोटी खर्च करून शाळा बांधून दिली. आदिवासी भागात दोन शाळा बांधून दिल्या. आता आणखी तीन शाळांचे काम सुरू आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दूरवस्था पाहावत नसल्याने मी शैक्षणिक मदतीचे कार्य करण्याचे काम हाती घेतले आहे.
मी तेलगू भाषेपासून सोलापुरात सुमारे पाच लाख तेलुगू बांधव राहतात, या लोकांच्या येथे शैक्षणिक संस्था आहेत हे ऐकून अभिमान वाटला. सोलापुरातील तेलुगु भाषिकांसह कुठल्याही समाज बांधवांसाठी मी शैक्षणिक मदत करण्यास इच्छुक आहे केवळ तेलंगाणा महाराष्ट्रच नव्हे तर सबंध देशात हे काम मला करावयाचे आहे. शिक्षणाने माणसाची प्रगती होते यावर माझा ठाम विश्वास असल्याने वंचित घटकांचा शैक्षणिक उद्धार झाल्यास त्यांची भविष्यात चांगली प्रगती होईल, अशी मला आशा आहे,असे सिद्धूरेड्डी कंदकटला म्हणाले.
पत्रकार परिषदेत तेलगू अभिनेता इंद्रसेना बुद्धम, विशाल काळे, विपुल मिरजकर आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment