Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, August 7, 2024

राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष किरण माशाळकर यांना स्वयंम महिला रत्न पुरस्कार 2024 प्रदान..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष किरण माशाळकर यांना स्वयंम महिला रत्न पुरस्कार 2024 प्रदान.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशन द्वारकाधीश महिला मंडळ व जिजाऊ महिला मंच संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वयंम महिला रत्न सन्मान सोहळा च्या दरम्यान राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष व स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष किरण माशाळकर यांना स्वयंम महिला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा कला सामाजिक राजकीय क्षेत्रात किरण माशाळकर काम करतात.स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन मध्ये गेली अनेक वर्ष सामाजिक काम किरण माशाळकर करत आहेत. 


आतापर्यंत त्यांना सर्व क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. त्यात 2024 मध्ये त्यांचा हा पाचवा सामाजिक पुरस्कार आहे.महिला रत्न पुरस्कार, बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड, युवती आयकॉन पुरस्कार,डायनामिक युथ अवॉर्ड, असे पुरस्कार या वर्षात मिळाले आहे आणि हा पाचवा स्वयंम महिला रत्न पुरस्कार मिळाला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पलता माताजी मठाधिपती, जयश्री मेहता सामाजिक कार्यकर्ता,नसीमा पठाण जेष्ठ साहित्यिका,आधी कार्यक्रमास उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment