सारा न्यूज नेटवर्क -
विजापूर नाका पोलिस स्टेशन परिसरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न;
विजापूर नाका पोलिस स्टेशन व इको नेचरक्लबचा पर्यावरणपूरक उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- संत तुकाराम महाराजांच्या 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' या विचारानुसार, झाडांशी असलेल्या आपल्या नात्याला या वृक्षारोपणाने एक वेगळा अर्थ दिला आहे.
'एक पेड माँ के नाम' वृक्ष अभियानांतर्गत सोलापूर पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार विजापूर नाका पोलीस ठाणे व इको नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने विजापूर नाका पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड व इतर पोलीस अधिकारी यांच्या हस्ते रोप लावण्यात आले. तसेच प्रत्येक पोलीस अधिकारी यांना इको नेचर क्लब तर्फे रोप भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी उपस्थिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, इकोनेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक तथा महाराष्ट्र शासन वसुंधरा अभियानाचे पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, डॉक्टर प्रशांत राठोड ,पोलीस निरीक्षक संगीता ताई पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे, विजापूर रोड मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश देवकर, पोलीस कॉन्स्टेबल हुंडेकरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल जाधव, यांच्या उपस्थितीत 'एक पेड माँ के नाम' या अभियानाला प्रतिसाद देत वृक्षारोपण करण्यात आले .
विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील मोकळ्या परिसरात ५०० वृक्षांची लागवड आतापर्यंत करण्यात आली आहे व त्याचे संवर्धनही करण्यात येत आहे. याठिकाणी विविध फळांचे, फुलांचे तसेच देशी औषधी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment