Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 8, 2024

दोन लाखांची लाच घेणारा मंडळअधिकारी व तलाठी लाचलूचपत च्या जाळ्यात;



 सारा न्यूज नेटवर्क - 

दोन लाखांची लाच घेणारा मंडळअधिकारी व तलाठी लाचलूचपत च्या जाळ्यात;

 लाच स्वीकारण्यात महसूल विभाग ठरतोय अव्वल..

सोलापूर (प्रतिनिधी ):-  संगणकीकरणामुळे बंद झालेला सातबारा उतारा चालू करून देण्यासाठी सहा लाखाची लाच मागून तडजोड करून चार लाख ठरले आणि त्यातील पहिला हप्ता २ लाख घेतल्याप्रकरणी उत्तर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. संदिप भिमराव लटके, पद मंडळ अधिकारी, (वर्ग-३), नेमणूक सोरेगांव मंडळ, तहसिल उत्तर सोलापूर जि. सोलापूर व पवनकुमार मोहनराव चव्हाण, पद तलाठी, (वर्ग-३) नेमणूक सज्जा नेहरुनगर सोलापूर, तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर जि. सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. 

यातील तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीची नेहरुनगर सोलापूर येथे ८६.६७ आर खुली जागा असून महसुल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे सदर जागेचा बंद झालेला ७/१२ उतारा पुन्हा चालु करण्याचे अनुषंगाने महसुल अधिनियम कलम १५५ अंतर्गत तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्याकरीता संदिप लटके, पद मंडळ अधिकारी सोरेगांव व पवनकुमार चव्हाण, पद- तलाठी नेहरुनगर सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ६,००,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंति ४,००,००० रुपये लाच रक्कम स्वीकारण्यची संमती दिली. व त्यापैकी पहिला हप्ता २,००,००० रुपये स्वीकारण्यास संमती दिल्यावरुन लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


➡️ सापळा पथक :- पोलीस निरीक्षक - उमाकांत महाडिक

पोलीस अंमलदार-  पोहवा/ शिरीष कुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोना / स्वामी राव जाधव सर्व ने. अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर

पर्यवेक्षण अधिकारी :-  श्री गणेश कुंभार, पोलिस उप अधीक्षक, ला. प्र. वि. सोलापूर

मार्गदर्शन अधिकारी :- श्री अमोल तांबे ,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे परिक्षेत्र.(मोबाईल क्र 9922100712)

डॉ. शीतल जानवे/खराडे , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. (मोबाईल क्र. 9921810357)

सक्षम अधिकारी :- मा. जिल्हाधिकारी, सोलापूर

      आवाहन - 

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. 

 (गणेश कुंभार) सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.

मो.क्र. 9764153999,  कार्यालय क्र 0217-2312668

ईमेल- dyspacbsolapur@gmail.com

Toll free no- 1064

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment