Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, August 9, 2024

पत्रकार सुरक्षा समितीचे क्रांती दिनी उपोषण; पत्रकारांच्या प्रश्नावर यशवंत पवार रस्त्यावर..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार  सुरक्षा समितीचे क्रांती दिनी उपोषण;

पत्रकारांच्या प्रश्नावर यशवंत पवार रस्त्यावर.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना  राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले मारहाण धमकी खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या संदर्भात  स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी या सह राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात  पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले अनेक वर्षांपासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत  महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण चे प्रमाण वाढले असून राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाही  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 

*पत्रकार सुरक्षा समितीचे शुक्रवार  दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन गेट जिल्हा परिषद येथे उपोषण करण्यात आले*

  प्रश्नावर राज्य सरकार उदासीन  प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र 

 महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर दिवसेंदिवस होणारे हल्ले धमकी मारहाण  त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी केली  

पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे - कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे  

 महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी  पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र यांनी यावेळी केली 

 *राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला वेळ नाही का*? जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख यांचा राज्य सरकारला सवाल.  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे  विविध प्रश्न राज्य सरकारकडे धूळखात पडले असून  पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी  राज्य सरकारला वेळ नाही का? असा जळजळीत सवाल  पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख यांनी सरकारला विचारला आहे. 


 पत्रकारांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत- - शहराध्यक्ष राम हुंडारे कडाडले 

 महाराष्ट्र राज्यात पत्रकारांचे प्रश्न  दिवसेंदिवस  अतिशय गंभीर व जटील होत असून  पत्रकारांच्या प्रश्नावर  पत्रकारांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत  असे परखड मत पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे यांनी यावेळी व्यक्त केले आहे 

 राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  पत्रकार सुरक्षा समिती वतीने  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  9 ऑगस्ट क्रांती दिन  सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे 

 यावेळी  दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद  दैनिक अब तक चे संपादक  प्रसाद जगताप दैनिक अब तक चे कार्यकारी संपादक  शाहनवाज कंपली इस्माईल शेख  मोहसीन बागवान डीडी दर्पण न्यूज व साप्ताहिक यश क्रांतीचे संपादक डी डी पांढरे  ब्रिलियंट टाईम्सचे संपादक इम्तियाज अक्कलकोटकर  पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) मोहम्मद इंडीकर  ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी साप्ताहिक फुलेवाद चे संपादक अशोक ढोणे  सिद्धेश्वर पुजारी कुणाल धोत्रे दिव्य न्यूजचे संपादक मुन्ना पठाण इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment