Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 29, 2024

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना 'सर सन्मान 'पुरस्कार जाहीर...


 सारा न्यूज नेटवर्क - 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांना 'सर सन्मान 'पुरस्कार जाहीर... 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  स्टेट इनोव्हेशन  अंन्ड रिसर्च फौंडेशन च्यावतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 'सर सन्मान' या पुरस्कारासाठी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त विजय उर्फ अमोलराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब  वाघ  महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे यांनी दिली. अमोलराजे भोसले यांना लोक कल्याणसाठी शैक्षणिक, त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात  भरीव योगदान दिल्याच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण ३१ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्समध्ये होणार आहे. हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेचे संचालक अशोक काकडे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment