Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, August 26, 2024

आळंदीत महिला पोलीस शिपायांची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

आळंदीत महिला पोलीस शिपायांची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या;

घटनेची माहिती  मिळताच आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल,

आळंदी (संभाजी पुरीगोसावी ) पुणे जिल्हा प्रतिनिधी :-  पुणे जिल्ह्यातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पोलीस प्रशासनांतून हळहळ व्यक्त होत आहे, आळंदी मध्ये इंद्रायणी नदीपात्रात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने उडी मारून आपले जीवन संपविले आहे, अनुष्का सुहास केदार (वय 20) रा. लक्ष्मीनगर दिघी ) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल चे नाव आहे, याबाबत आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार ... अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या, त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या, त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारांस इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये उडी मारून आपले जीवन संपविले आहे, या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे, मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, त्यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत, महिला कॉन्स्टेबलने असे टोकाचे पाऊलं का उचलले? याचाही शोध घेतला जात आहे, महिला पोलिसांनीच असे टोकाचे पाऊलं उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment