Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, August 11, 2024

मोबाईल क्रमांक व्यतिरिक्त कोणताही पुरावा नसताना तांत्रिक पद्धतीने IMEI चे विश्लेषण करून महिलांना त्रास देणाऱ्या तरुणाला अटक;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मोबाईल क्रमांक व्यतिरिक्त कोणताही पुरावा नसताना तांत्रिक पद्धतीने IMEI चे विश्लेषण करून महिलांना त्रास देणाऱ्या तरुणाला अटक;

निर्मलनगर पोलिस ठाण्याची दमदार कामगिरी.. 

मुंबई(प्रतिनिधी) : - महिलांना अश्लील ध्वनिचित्रफीत पाठवून त्यांना त्रास देणाऱ्या विकृताला अखेर अटक करण्यात निर्मलनगर पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गु र क्र 407/24, कलम 509 भादवि सह 67 (A) विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आहे. त्याच्या मोबाइलच्या तपासणीत तो मुंबईतील २५ महिलांना त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (३६) असे अटक आरोपीचे नाव असून तो वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरात पराठा शॉप चालवतो. मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासीआहे. आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

वांद्रे पूर्व येथील ३० वर्षीय गृहिणीला १४ जून रोजी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणारी व्यक्ती अश्लील संभाषण करू लागली. महिला दूरध्वनीवर त्याला ओरडली असता आरोपीने तिला अश्लील ध्वनिचित्रफीत पाठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती घाबरली. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार त्रास देत असल्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी निर्मलनगर पोलिसांकडे तक्रार केली. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख, पो.ह सावळे /९८०६३८,पो.ह साळुंखे /०३१३६९ यांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. पोलिसांनी संभाषणाद्वारे विनयभंग व अश्लील संदेश पाठवणे अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी महिलांना संदेश पाठवण्यासाठी पासवर्ड नसलेला अथवा पासवर्ड माहिती असलेल्या वायफायचा वापर करीत होता. जप्त मोबाइलमध्ये अश्लील चित्रफितीही असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment