सारा न्यूज नेटवर्क -
चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व असे की, विद्यार्थी व नागरिकांना वाचनासाठी प्रोत्साहित करणे. कारण डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे वाचनाचे व ज्ञानार्जनाचे मोठे चाहते होते. या दिवशी वाचन संस्कृती रुजवण्यावर आणि लोकांना वाचनाची आवड निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो.
वाचनाद्वारे ज्ञान मिळवण्यासाठी आणि स्वतःला समृद्ध करण्यासाठी हा दिवस एक महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच एक भाग म्हणून आज चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ.ए.पी.जे. शअब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार, पर्यवेक्षक डॉ.बंडोपंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment