सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार कृती समितीमार्फत महात्मा गांधी जयंती, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. 2 ऑक्टोबर 2025 – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पत्रकार कृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांनी आपल्या भाषणात गांधीजींच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितले की,
“गांधीजींचे विचार सत्य आणि अहिंसेवर आधारित होते. स्वतःमध्ये बदल घडवून समाजासाठी सेवा करणे, साधे व सरळ जीवन जगणे आणि प्रेम, क्षमा व सहिष्णुता या मूल्यांना जीवनात स्थान देणे हे त्यांचे शिकवण होते. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी अहिंसक मार्गाचा पुरस्कार केला.”कार्यक्रमात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पत्रकार कृती समिती कडून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी निमित्त सोलापूरकरांना पत्रकार कृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला आप्पासाहेब लंगोटे यांच्यासह लतीफ नदाफ, सैपन शेख,नितीन करजोळे, ईनुस अत्तार, अस्लम नदाफ, यशवंत पवार, अमोल कुलकर्णी, अक्षय बबलाद, यशवंत फडतरे आदी पत्रकार उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment