सारा न्यूज नेटवर्क -
समता विद्या मंदिर, जोर्वे येथे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेहमेळावा जल्लोषात साजरा
जोर्वे (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर):- समता विद्या मंदिर, जोर्वे येथे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला. तब्बल वीस वर्षांनंतर सर्व मित्र-मैत्रीणी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. पोखरकर सर, मा. श्री. यशवंत दिघे सर, तसेच माजी शिक्षक श्री. हासे सर, श्री. बोरुडे सर, श्री. मुळे गुरुजी, श्री. पर्बत गुरुजी, श्री. दिघे गुरुजी श्री. कानवडे सर, श्री. घबाडे सर, श्रीमती बोरकर मॅडम, श्रीमती देशमुख मॅडम, श्रीमती रासने मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सध्याच्या युवकांसमोरील आव्हाने आणि त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षक आणि शिक्षिका यांचा शॉल, फेटा, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भोजन व्यवस्था व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची, खो-खो यांसारख्या खेळांनी वातावरण रंगले.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले. “भूतों ना भविष्यती” असा अविस्मरणीय कार्यक्रम होईल, अशा पद्धतीने सर्व मित्र-मैत्रीणींनी परिश्रम घेतले.
या आयोजनात प्रा. अशोक इंगळे, श्री. संतोष जोर्वेकर, श्री. सलील शेख, श्री. अनिल क्षीरसागर, श्री. संतोष काकड, श्री. रविंद्र खामकर, श्री. श्रीराम खंडागळे, श्री. सचिन राक्षे, श्री. सोमनाथ जोर्वेकर, श्री. हरीश जोर्वेकर, श्री. बाबासाहेब चासकर, श्री. गौतम सोनवणे,
श्री. राहुल बोरकर श्री. सचिन इंगळे सौ.स्नेहा गायकवाड, सौ. हर्षणा थोरात सौ. सविता गायकवाड सौ. अनिता इंगळे. सौ. सविता गायकवाड आदीं सर्व मित्र परिवाराचा मोलाचा सहभाग होता.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment