Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, October 7, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत उर्वरीत मंडळाचा समावेश करणे व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची आमदार राजू ज्ञानू खरे  व उमेश पाटील यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी.


मुंबई (प्रतिनिधी) :- मोहोळ तालुक्यात ११ सप्टेंबर २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे व नंतर आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे, बांधकामांचे, घरांचे तसेच जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील ९ पैकी ८ महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून, शासनाकडून अद्याप महापुर बाधीत मंडळे वगळता इतर मंडळातील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजन मंत्री मा. अजितदादा पवार यांची आमदार राजू ज्ञानू खरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. उमेशदादा पाटील उपस्थित भेट घेऊन, मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत तात्काळ निर्णय घेऊन महापुर बाधित मंडळे व इतर अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त मंडळातील पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे निवेदन दिले.



मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळ शेटफळ व पेनुर अंशता: भाग वगळता सर्व महसूल मंडळांतील एकूण ४१ गावे अतिवृष्टीग्रस्त असून, शेती पिकांचे, बांधकामांचे, घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

काही भागात १५ ते १८ इंचांपर्यंत पावसाची नोंद झाली असून,

टाकळी परिसरात सुमारे ८२.२० मिमी तर

वाघोली वटवटे जामगाव येणकी औडी परिसरात ९०.०० मिमी इतका मुसळधार पाऊस झाल्याचे नोंदवले गेले आहे.



या अतिवृष्टीमुळे नाल्यांना व ओढ्यांना पूर आल्याने अनेक शेतजमिनींमधील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे बांधकामे आणि घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


आमदार राजू खरे यांची मागणी:


आमदार राजू ज्ञानू खरे यांनी निवेदनात नमूद केले की:

संबंधित महसूल मंडळांतील ४१ गावे अतिवृष्टीग्रस्त असल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.

कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा.

जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या बाबतीत तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि शासनाकडून मदतीसाठी निधी मागवावा.

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीकविमा, घरांचे नुकसान भरपाई, जनावरांचे नुकसान भरपाई यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.


प्रशासनास सूचना:

आमदार खरे यांनी यावेळी सांगितले की, अतिवृष्टीच्या काळात त्यांनी स्वतः नरखेड, कामती, टाकळी सिकंदर, वाघोली महसूल मंडळांतील गावांची पाहणी केली आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर आणि उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. उमेशदादा पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवेदनातील मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment