सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकारांना लवकरच मिळणार हक्काची घरे घरकुल योजने चा प्रश्न लागणार मार्गी पत्रकार सुरक्षा समितीच्या लढ्याला अखेर यश ----प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
सोलापूर (प्रतिनिधी ) :-पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात रहात असून अल्प मानधन व तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक १८/६/२०२५ निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजना बाबत निवेदन सादर करण्यात आले होते यावेळी अनेक पत्रकार उपस्थित होते
सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकी हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना बाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेतली असून पत्रकारांच्या घरकुल योजना बाबत पुढील कार्यवाही साठी मा. संचालक ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment