Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, October 15, 2025

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क - 

 तब्बल पंधरा वर्षानंतर सोलापूर मुंबई विमान सेवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू.

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन विमान कंपन्यांची विमानसेवा. पण विमानसेवा सुरू करणाऱ्या विचार मंचचा प्रशासनाला पडला विसर.


सोलापूर (प्रतिनिधी) :- आज स्टार एअर कंपनीची सोलापूर ते मुंबई व मुंबई सोलापूर  विमान सेवा सुरू झाली त्याचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, नागरी उद्ययन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवरांनी केले. 



पहिल्या विमानात सुमारे पंनास प्रवाशांनी प्रवास केला व हे विमान सोलापूर वरून ठीक चार वाजून दहा मिनिटांनी निघून मुंबईमध्ये पाच वाजून वीस मिनिटांनी पोहोचले .



विमानतळावर सोलापूर विचार मंच तर्फे स्याविन आडके व स्वेतलाना आडके यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 




सोलापूर विचार मंचने मागील पाच वर्षांमध्ये सोलापूरचे होटगी रोड विमान तळ सुरू करण्यासाठी व येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यामध्ये आज सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू झाल्याने खऱ्या अर्थाने सोलापूर हे आज आंतरराष्ट्रीय पटलावर आणले आहे व येथून पुढे सोलापूरची प्रगती झपाट्याने होईल. लवकरच सोलापुरातून हैदराबाद ,बेंगलोर तिरुपती, नवी दिल्ली व अहमदाबाद या ठिकाणी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू  करण्यासाठी या विमानात प्रवास करणारे सोलापूर विचार मंचचे सहसंस्थापक डॉ. संदीप आडके यांनी सांगितले. सोलापूर विचार मंचने आपल्या प्रयत्नातून व लोकसहभागातून अशक्य वाटणाऱ्यी सोलापूरची विमानसेवा शेवटी सुरू करून दाखवलेली असताना सुद्धा याप्रसंगी प्रशासनास सोलापूर विचार मंचचा विसर पडावा ही सुद्धा अतिशय खेदाची बाब आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment