Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, October 11, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शिक्षक राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार – 

रोटरी क्लब सोलापूर ईस्टतर्फे ‘ नेशन बिल्डर अवॉर्ड ’ वितरण सोहळा.. 



सोलापूर (प्रतिनिधी) :- शिक्षक हे समाजाचे दिशादर्शक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या कार्यातूनच संस्कारित, सुजाण आणि सशक्त राष्ट्राची निर्मिती होते.

या उदात्त भावनेचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट तर्फे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड' वितरण सोहळा’ दिमाखात पार पडला.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वास्तूविशारद श्री. ओमप्रकाश दरक उपस्थित होते, तर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या सह प्रांतपाल श्रीमती जयश्री चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचे प्रेसिडेंट श्री. कार्तिक चव्हाण होते, तर सेक्रेटरी डॉ. मनोज देवकर व्यासपीठावर उपस्थित होते.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्व प्रांतपाल डॉ. मोहन देशपांडे यांनी केले. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी रोटरी क्लबच्या १२० वर्षांच्या सेवायात्रेचा थोडक्यात इतिहास सांगत, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकला.

त्यांनंतर सह प्रांतपाल श्रीमती जयश्री चव्हाण यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती देत रोटरी केवळ सेवा नव्हे तर सामाजिक भान जपणारी संस्था असल्याचे प्रतिपादन केले.


प्रमुख पाहुणे श्री. ओमप्रकाश दरक यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात समाजनिर्मितीत शिक्षकांचे अमूल्य योगदान अधोरेखित केले.

“शिशु, बाल, किशोर, तारुण्य, प्रौढ व वृद्धावस्था या प्रत्येक टप्प्यात शिक्षकाचे स्थान अपरिहार्य आहे,” असे सांगत त्यांनी अध्यात्मिक उदाहरणांनी शिक्षकाच्या जबाबदारीची जाणीव उपस्थितांना करून दिली.



या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

सन्मानित शिक्षकांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता —

श्रीमती डॉ. शलाका रावसाहेब निरंतर, श्री. रोहित मंजन होटकर, श्री. सिद्राम रामकृष्ण कंदी, श्री. नामदेव सदाशिव देशमाने, श्री. सुरेश नरसप्पा सरगम, श्रीमती डॉ. ज्योती धर्मेंद्र माशाळे, श्री. महम्मद ईलाही शेख, श्रीमती मिना कमलाकर ओहोळ, प्रा. किरण एस. पाटील आणि श्री. मल्लिकार्जून सिद्धाराम पाटील.


पुरस्कारप्राप्त शिक्षकांपैकी श्री. महम्मद इलाही शेख यांनी मनोगतातून रोटरी क्लबच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत, शिक्षकांच्या नैतिक जबाबदारीवर प्रकाश टाकला.


कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश्वर जाधव व डॉ. श्रीकांत जोशी यांनी केले. कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त शिक्षक, त्यांचे कुटुंबीय आणि रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्टचे डॉ. संजय मंठाळे, रंजना शिरसाट, वैभव होमकर, सचिन जोशी, ऋतुराज निलेगावकर, शहाजी कांबळे, पूर्व प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतन आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment