Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, October 4, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प शाळेस सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तर (शहर) खो खो स्पर्धेचे विजेतेपद... 

 सोलापूर (प्रतिनिधी) :- शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे मार्फत  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका सोलापूर  यांच्याद्वारे  आयोजित शहर जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्पच्या मुलींनी राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल चा 1 डाव 6 गुणांनी पराभव करत आपले वर्चस्व कायम राखले.

 जय जवान जय किसान सैनिकी शाळा, नेहरूनगर सोलापूर येथे झालेल्या सोलापूर शहर जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील मुला व मुलींच्या खो खो स्पर्धेत एकूण 86 शाळांनी सहभाग घेतला होता. सोलापूर जिल्हा अम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव श्री उमाकांत गायकवाड, पंचप्रमुख श्री गोकुळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड, स्पर्धा संयोजक श्री रवी चव्हाण, अजित शिंदे, मोहन राजपुत यांच्या उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाल्या. 



 या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प च्या मुलींच्या संघाने माध्यमिक आश्रम शाळा देगाव, भारती विद्यापीठ, साईबाबा माध्यमिक विद्यालय, सिद्धेश्वर प्रशाला, अशा नामांकित संघांना पराभूत करत अंतिम सामन्यात राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा 1 डाव 6 गुणांनी पराभव करत पुणे विभागीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला. सोलापूर शहरात जिल्हा परिषदेच्या 40 शाळा असून केवळ एकमेव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प शाळेने  शासनाच्या या स्पर्धेत सहभागी होऊन सलग दुसऱ्या वर्षी 14 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले आहे. शहरात असणाऱ्या सर्व माध्यमिक व  प्राथमिक शाळा या स्पर्धेत सहभागी होतात. हा संघ पुणे विभागीय स्पर्धेसाठी अहमदनगर येथे रवाना होणार आहे.

 गतवर्षी पदार्पणातच विजय पताका घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या स्पर्धेत आपले वर्चस्व निर्माण केले आहे ते यावर्षी पुन्हा त्यांच्याकडे आबादीतआहे.

 अंतिम स्पर्धेत कुमारी सृष्टी शरणप्पा हडपद 3.00 मिनिटे संरक्षण व 3 गडी बाद केले. अक्षता सन्मुखपा गंगोंडा दोन मिनिटे 30 सेकंद संरक्षण व 2 गडी बाद केले, पवित्रा इरेश नागलगाव हिने 1 मिनिट 40 सेकंद संरक्षण करत 5 गडी बाद केले. प्रज्ञा परशुराम जमादार हिने 1 मिनिट संरक्षण करत 1 गडी टिपला. राज मेमोरियल स्कूल कडून इशा गोगावे हिने दोन मिनिटे संरक्षण व दोन गडी बाद करत संघाचा पराभव वाचवण्याचा प्रयत्न केला.

 विजयी संघ - अक्षता गंगोंडा( कप्तान), पवित्रा नागलगाव, सृष्टी हडपद, प्रज्ञा जमादार, जानवी पडसलगी, कमलाबाई पडसलगी, रेणुका चव्हाण, अंबिका मदरे, आदिती सुवर्णकार, ऐश्वर्या पुजारी, श्रीदेवी कोंडूर, वेदिका जाधव, राणी मठ. 

 या खेळाडूंचे एस आर पी एफ ग्रुप नंबर 10 च्या समादेशक साहेब डॉक्टर दिपाली काळे, सहायक समादेशक मते साहेब, सोलापूर जिल्हा अम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बापूसाहेब जमादार, कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय सावंत, मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सप्रियांका माळी,  शाळेतील शिक्षक बाळासाहेब खटाळ, श्रीशैल समदूरले, सारिका राठोड, अंगणवाडी सेविका राजश्री करकटी, कल्पना बिराजदार श्वेता उंबराजे, सोनाली भोसले आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment