सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा,भ्रष्टाचार विरोधी मंचची मागणी.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यात गेल्या २-३ आठवड्यापासून सातत्याने मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा खुप मोठा नुकसान झाला आहे. हाताला आलेली पीक मुसळधार पावसामुळे पुर्णपणे नाश झाली आहे. शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे जगणे, उदारनिर्वाह सगळे साधन विस्कटीत झाले आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करुन, पंचनामे न करता प्रत्येक शेतकरीला एकरी २० हजार रुपये व हेक्टरी ५० हजार रुपये मदत तात्काळ जाहिर करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख सादिक शेख, प्रदेश कार्याध्यक्ष मीर महामुद खान, पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख,
जिल्हाध्यक्ष सादिक मुजावर, शहर कार्याध्यक्ष मोहसिन बागवान, विश्वमत न्युज चे संपादक कबीर तांडुरे,मेहबूब मुजावर,अल्ताफ शेख,लतीफ शेख, सुजित उमाप,जुबेर शेख, उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment