सारा न्यूज नेटवर्क -
साप्ताहिक कार्यसम्राट ने समाजाला दिशा दिली -जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे
साप्ताहिक कार्यसम्राट दिवाळी विशेष अंकाचे थाटात प्रकाशन
सोलापूर (प्रतिनिधी ) :- गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे मुख पत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे सोलापूर येथे थाटात प्रकाशन करण्यात आले
पत्रकारिता एक वसा ध्यास समजून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात नेहमी आवाज काढत पिढीतांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे साप्ताहिक कार्यसम्राट ने समाजाला दिशा देण्याचे काम केलं असून सोलापूर शहर जिल्ह्यात साप्ताहिक कार्यसम्राट ने आदर्श वृत्तपत्र म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केल्याचं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे यांनी प्रकाशन वेळी केलं असून संपादक यशवंत पवार यांनी समाजातील तळागाळांचे प्रश्न शासन दरबारात मांडून वाचा फोडण्या चे काम केलं असल्याचे यावेळी आवर्जून सांगत साप्ताहिक कार्यसम्राट च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
याप्रसंगी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी रोहित घोडके श्रीनिवास पेद्दी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment