Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, October 23, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 बंद असलेल्या पोलीस चौक्या प्रकरणी यशवंत पवार यांच्या तक्रारी ची विभागीय आयुक्त  पुणे यांनी घेतली दखल, पोलीस आयुक्त यांना योग्य त्या कार्यवाही साठी दिले पत्र. 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  वाढत्या लोकसंख्येमुळे सोलापूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून शहराची संख्या जवळपास १६ लाख


असून सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर असून वर्षाचे बारा महिने वेगवेगळ्या स्वरूपाचे सण उत्सव साजरे होत असतात


त्याचबरोबर मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातून निघतात तसेच राजकीय सभा मेळावे बैठका त्याच बरोबर मंत्री

मंडळातील मंत्री महोदय नेहमीच सोलापूरला येत असतात या सर्व बाबींचा पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडत असला तरी

कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासन कुठेही कमी पडलेले नाही. यापूर्वी सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी

नागरिकांच्या अडचणीचे निवारण होण्यासाठी त्याच बरोबर भांडण तंटे मारामाऱ्या रोखण्यासाठी व वेळीच पायबंध

घालण्यासाठी सोलापूर शहरात जवळपास २३ पोलीस चौक्या उघडण्यात आल्या होत्या पण सध्या त्यातील बहुतेक पोलीस चोक्या कुलूप बंदच आहेत

पोलीस चौकी आपल्या भागात असल्याने नागरिक देखील आपली तक्रार फिर्याद नोंदविण्यासाठी जवळ असलेल्या पोलीस 

 जायचे. आता परिस्थिती बदलली असून नागरिकांना आपल्या तक्रारी फिर्याद व अडचणी बाबत पोलीस स्टेशनला जावं

लागत आहे सोलापूर शहरात दोन गटात हाणामारी दगडफेक चोरी घरफोडी अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले असून नागरिकांना  मदतीसाठी

अनेकदा डायल ११२ वर कॉल करावे लागत आहे सोलापूर शहराचा विस्तार वाढत्या लोकसंख्य मुळे झपाट्याने वाढला असून

असून नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन ला जाणं खूप लांब पडत आहे अनेक नगरवस्त्यापासून पोलीस

स्टेशन चे अंतर मोठे असून पोलीस स्टेशन लांब असल्यामुळे नागरिकांना आपली तक्रार / फिर्याद नोंदवण्यासाठी फार कसरत व पायपीट करावी लागत आहे त्याचबरोबर वेळेत पोलिसांची मदत देखील मिळत नसल्याने नागरिकांना फार मोठ्या अडचणीतचा  सामना करावा लागत आहे याबाबत  जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक १०/७/२०२५ रोजी  सोलापूर चे पोलीस आयुक्त सोलापूर तसेच दिनांक  10/7/2025

रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते परंतु सोलापूर शहरातल्या बंद केलेल् पोलीस चौक्या सुरु करण्या बाबत बाबत पोलीस प्रशासन कडून कोणताही निर्णय झालेला नसल्याने जेष्ठ पत्रकार यशवंत यांनी सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरु करणे बाबत पुणे येथे विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन रीतसर निवेदन सादर केले होते या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरु करणे बाबत सोलापूर चे पोलीस आयुक्त यांना योग्य त्या कार्यवाही साठी पत्र दिले असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे


No comments:

Post a Comment