सारा न्यूज नेटवर्क -
यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत विजयी घोडदौड !
सोलापूर (प्रतिनिधी) :- एन. ए.बी. संचलित,चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सोलापूर मधील
विद्यार्थ्यांनी शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत आपला धबधबा कायम ठेवला यंदाच्या वर्षी झालेल्या शहरस्तरीय स्पर्धेत एकूण ४ सुवर्णपदक,६ रौप्यपदक व ६ कांस्यपदक असे एकूण १६ पदके पटकवून खेळाडूंनी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची पदक संपादन करण्याची परंपरा अबाधित ठेवली.
विजयी खेळाडूंचे अभिनंदन नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
मा.प्रकाशजी यलगुलवार,उपाध्यक्ष मा.श्री.अंकुश कदम सर, कार्यकारणी सदस्य मा.हार्दिक निमाणी सर,श्री.सरगम सर तसेच प्रशाला व उच्च माध्यमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका /प्राचार्या मा.सीमाताई श्रीगोंदेकर-यलगुलवार मॅडम,प्रशाला व उच्च माध्यमिक विदयालयाचे पर्यवेक्षक मा. डॉ. बंडोपंत पाटील सर, आदी मान्यवरांनी विभागीय स्पर्धेसाठी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
क्रीडाशिक्षक श्री.सुरेश बटगिरे सर,श्री.श्रावण इंगळे सर,
श्री.प्रेमकांत सुपेकर सर या क्रीडा शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
झालेल्या शहरस्तरीय मैदानी स्पर्धेतीत पदके मिळवणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे -
१. कुस्ती (फी स्टईल)- चि. विनायक मनसावाले ५७ किलो ग्रॉम १९ वयोगट - प्रथम कमांक विभागिय निवड.
२. कुस्ती (फी स्टईल)- चि. अखलाक शेख ४१ किलोग्रॅम १४ वयोगट - व्दितीय कमांक
३. कुस्ती (फी स्टईल)- चि. संदेश बहिरगोंडे ६५ किलो ग्रॅम १७ वयोगट - तृतीय कमांक
४. वेटलिफ्टींग - कु. विदया म्हेत्रे ६६ किलो ग्रॅम १९ वयोगट प्रथम कमांक विभागिय निवड.
५. वेटलिफ्टींग - कु. साक्षी दामणकर ४९ किलो ग्रॅम १९ वयोगट व्दितीय कमांक
६. वेटलिफ्टींग - चि. हरीष शिंदे ६६ किलो ग्रॅम १९ वयोगट व्दितीय कमांक
७. वेटलिफ्टींग - चि.संदेश बहिरगोंडे ६२ किलो ग्रॅम १९ वयोगट व्दितीय कमांक
मैदानी स्पर्धा (दिनांक १६ ऑक्टोंबर १८ ऑक्टोंबर)
८. लांब उडी - कु.दिप्ती खानापुरे १४ वयोगट प्रथम कमांक विभागीय निवड.
९. थाळी फेक - कु.रनकुमारी जगले १७ वयोगट तृतीय कमांक
१०. तिहेरी उडी - कु.साक्षी दामणकर १९ वयोगट प्रथम कमांक विभागीय निवड.
११. तिहेरी उडी - चि.सार्थक चुंबळकर १९ वयोगट तृतीय कमांक
१२. हॅमर थ्रो - कु. वैभवी मरेड्डी १९ वयोगट व्दितीय कमांक
१३. हॅमर थ्रो - कु. साक्षी दामणकर १९ वयोगट तृतीय कमांक
१४. उंच उडी - चि. सार्थक चुंबळकर १९ वयोगट व्दितीय कमांक
१५. भाला फेक - कु. वैभवी मरेड्डी १९ वयोगट तृतीय कमांक
१६. थाळी फेक - कु. वैभवी मरेड्डी १९ वयोगट तृतीय कमांक
वरील खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून लवकरच विभागीय स्पर्धेत हे यशस्वी खेळाडू सहभागी होणार आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment