सारा न्यूज नेटवर्क -
मजबूत राष्ट्रासाठी धर्मसत्ता महत्त्वाची माजी सहाय्यक आयुक्त तथा सचिव भाजपा प्रकाश राठोड यांचे प्रतिपादन...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरातील प्रभाग क्र.२३ येथील विजापूर रोड जयकुमार नगर नुतन प्रशाला जवळ मागील अनेक वर्षापासून अर्धवट काम झालेले मंदिर श्री.हनुमान मंदिर श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री.महादेव मंदिराचे भाजपा शहर सचिव तथा माजी साहाय्यक आयुक्त श्री.प्रकाशभाऊ राठोड यांच्या वतीने जिर्णोद्धार करून कळसारोहण व लोकार्पण सोहळा अतिशय भक्तीने वातावरणात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ तसेच श्री.निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर यांच्या पूज्य हस्ते मंदिराचे कळसारोहण पार पडले. मंदिर उभारणी ही राष्ट्र उभारणीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असून, मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसत्ता खूप गरजेचे आहे.
असे धार्मिक स्थळ व धर्म सत्तेच्या माध्यमातून देव, देश, धर्म, शेती, माती आणि संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न केला जातो. मंदिर निर्मितीचे अनेक फायदे असतात जसे की आनंदी जीवन जगण्यासाठी सुख, शांती, समृद्धी आवश्यक आहे. आणि या गोष्टी भगवंताच्या चरणी लीन होऊन सत्कर्म केल्याने मिळत असतात. म्हणून अनेक ठिकाणी मंदिरे उभे राहावी यातून समाजाला योग्य दिशा मिळत असते. मंदिर उभारणी बरोबर धार्मिक साहित्य देखील निर्माण व्हावे कारण धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्माचे तात्विक/नैतिक तत्त्वज्ञान साहित्यातून निर्माण होतात. भारत हा एक मोठा धार्मिक राष्ट्र आहे. तात्विक दृष्ट्या, 'धर्म' हा सत्य, आचरण आणि धारण करण्याशी संबंधित आहे. त्याचे अनेक नैतिक पैलू देखील आहेत जसे की धैर्य, दया, क्षमा, शांती, सत्य, अहिंसा इत्यादी ज्यांना आपण धर्माच्या आधारे ओळखतो. असे प्रकाश राठोड यांनी बोलताना म्हणाले. कळस रोहन कार्यक्रमाला शेकडो महिला आणि पुरुष उपस्थित होते जयकुमार नगर, पापा रामनगर यामिनी नगर, सिमला नगर, माशाळे वस्ती येथे भव्य मिरवणूक काढून हजारो महिला डोक्यावरती कळस घेऊन रथामध्ये बसलेल्या महाराजांसोबत मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी प्रभागातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या सौ.कृष्णाताई लोहित बिरादार, माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव यांच्यासह शांतता स्वामी सर पवन जाधव, रवी निकम, शिवशंकर माळगोंडे, मुन्ना पटेल , गायक निखिल भालेराव संदीप स्वामी,गायक आकाश चव्हाण, विनीत जाधव सह पंच कमिटी उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment