सारा न्यूज नेटवर्क -
शहरस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेस दुहेरी मुकुट..
सोलापूर(प्रतिनिधी) : - दि. 3 व 4 ऑक्टोबर 2025 रोजी हरिभाई देवकरण प्रशाला येथे *शहरस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे* आयोजन सोलापूर महानगरपालिका क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते...
या स्पर्धेत एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने
*14 वर्षाखालील मुले* व
*14 वर्षाखालील मुली* या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले... *स्वामी विवेकानंद प्रशालेने या स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळून यश संपादन केले...*
या सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन नॅब संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष *मा.प्रकाशजी यलगुलवार*, उपाध्यक्ष *मा.अनुगीता पवार,* जनरल सेक्रेटरी *मा.के.डी. पाटील,* जनरल सेक्रेटरी *मा.शशीभूषण यलगुलवार,* सहसेक्रेटरी *मा.सीमा श्रीगोंदेकर* व मुख्याध्यापक *मा.डॉ.हणमंत नारायणकर* यांनी अभिनंदन केले...
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक *मा.खंडू शिंदे, मा.गणपती कोळी, मा.वेदांत तलकोकुल* व क्रीडा शिक्षक *मा.सुभाष माने* यांचे मार्गदर्शन लाभले...
अहमदनगर येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या दोन्ही संघांची निवड करण्यात आली आहे...
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment