सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार घरकुल योजना बाबत राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे 26 जानेवारी रोजी लाक्षणिक आंदोलन अनेक पत्रकारांची उपस्थिती..
सोलापूर (प्रतिनिधी ):- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात रहात असून अल्प मानधन व तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पत्रकारांना आपल्या मालकी हक्काची घरे घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर च्या जिल्हाधिकारी यांना दिनांक १८/६/२०२५ निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजना बाबत निवेदन सादर करण्यात आले होते.
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून राज्य सरकार च्या व केंद्र सरकार च्या अनेक योजना पासून तो दुर्लक्षित आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत असून तो घरकुल योजना पासून वंचित आहे स्वता ची पक्की घरे नसलेल्या पत्रकार बांधवाना पंतप्रधान आवाज योजना मधून घरकुल योजना साकार करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकार कडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे घरकुल योजना पासून वंचित असलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवाज योजना मधून मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने 26 जानेवारी रोजी स्वातंत्र्य दिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकार ने दखल न घेतल्यास आझाद मैदानात आंदोलन करणार प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या नऊ वर्षांपासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळावेत म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी देखील वेगवेगळ्या स्वरूपाचे निवेदन व पत्र व्यवहार केला आहे आता सोलापूर शहर जिल्ह्यातील मालकी हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांना लवकरात लवकर राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळवून द्यावेत अन्यथा मुंबई येथे आझाद मैदानात पत्रकारांच्या घरकुल योजना बाबतीत आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी सांगितले.
या लक्षवेधी आंदोलन प्रसंगी कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश उपाध्यक्ष मालिनाथ जळकोटे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव रमेश दग्गारी समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी, सुहास कुलकर्णी महमद तांबोळी जमीर तांबोळी इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment