Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, January 24, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सदभावना वंदे मातरम् मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त, एकता उत्सव कार्यक्रम.. 


सोलापूर :- ३४ व्या वर्षामध्ये व ६३ व्या वेळेस स‌द्भावना तिरंगा बंगला येथे, साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्र एकता सुत्र हाती घेऊन आम्ही स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरे करा असे प्रसारण ३४ वर्षापासून करित आहोत .

स्व. श्री. केशव महाराज यांनी २५ वर्षे, सद्भावना मिठाई केंद्रावर अनेक चविष्ट मिठाई पदार्थ बनवून या राष्ट्रीय उत्सवाची गोडी असंख्य देशभक्तांना पोहचविण्याचे कार्य केले. यंदा ६३ व्या वेळेसच्या सद्भावना मिठाई केंद्रावर त्यांचा मुलगा श्री दत्ता वाघमारे यांनी मिठाई बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे.

प्रजासत्ताक दिन २०२६ एकता उत्सवाचा प्रारंभ 'नागरिकांनी, एकजूटीसाठी प्रजासत्ताकदिन घराघरातून साजरा करावा' या संदेश प्रसारणाचे कार्य, गावोगावी एकता संदेश पत्रके पाठवून व सोलापूरात अनेक भागांमध्ये जाऊन पत्रके वाटून करण्यात आली.

२४ ते २६ जानेवारी : सद्भावना केंद्रावरून तिरंगा वस्तू व मिठाई वितरण ६३ व्या वेळेस करण्यात येणार आहे.

 यंदा सद्भावना तिरंगा केंद्रावर ३.५/४ फूटाची फायबरची भारतमाता मूर्ती उपलब्ध आहे .


मिठाई केंद्रावर - ड्रायफुट तिरंगा बर्फी, केशर लाडू, ड्रायफुट मसाला चिवडा, मसाला शेव-दाळ, मिळतिल

तसेच तिरंगा केंद्रावर-राष्टध्वज तसेच देशप्रेमाचे प्रतिक असे डायमंड तिरंगा आंगठी व बॅचेस, आकर्षक क्रॉस पितळी तिरंगा, अशोक स्तंभ-घडयाळ - नकाशा असे विविध प्रकारचे टेबलावरचे तिरंगा, हातातले कापडी तिरंगा, हाथाचे बॅन्ड, मफलर, की चेन, पताका, तिरंगा स्टीकर, तोरण, कॅप, तिरंगा टी शर्ट, तिरंगा ओढणी इ. अशा अनेक तिरंगा वस्तु उपलब्ध आहेत.


प्रजासत्ताक दिन उत्सव कार्यक्रम २०२६ :

* २६ जानेवारी, सकाळी ११.३० वा मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन

* २८ व ३० जानेवारी : राष्ट्रीय उत्सवाचे देशप्रेमाचे लाडू, तिरंगा वर्फी, आश्रमशाला, कॉलनीच्या घरांमध्ये काम करणारे कर्मचारी, वॉचमन, भाजी मार्केट, सद्भावना कार्यामध्ये मदत करणारे इ. वितरण करण्यात येणार आह.

* २९ जानेवारी, उत्सव कार्यक्रमात हातभार लावलेल्या रिशा चालकांना लाडू वितरण

पत्रकार परिषदेच्या वेळेस सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी, ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सौ सोना श्रुती स्नेहा गांधी, रूपा पारेख, नारायण छाबीया, प्रकाश लोढा, राकेश मालू मयुर सोलनकर, जयदेव बाहेरमठ हे हजर होते.  जय हिंद


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment