सारा न्यूज नेटवर्क -
कुमार करजगीने डॉ. संदीप आडके यांनी जुनी मिल जागेतील वादाबाबतच्या तक्रारी मागे घेण्यासाठी मागितलेली एक कोटी रुपये खंडणीची बातमी खोटी;
पोलीस आयुक्तांनी स्वतः या बातमीचे खंडन करून कुमार करजगीवर तातडीने कारवाई करायचे दिले आदेश..
सोलापूर :- सोलापुरातील बहुचर्चित जुनी मिल भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी याने दि. 23 जानेवारी 2026 रोजी पत्रकार परिषदेत डॉ. संदीप आडके यांनी त्याच्याविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी भर पोलिस आयुक्तालयात त्याचे सहकारी सतीश रजपूत याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याची अफवा धादांत खोटी असून त्याचे खंडन डॉ. संदीप आडके हे करत आहेत. त्याचबरोबर डॉ.संदीप आडके यांच्यावर कोर्टाने गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे. कुमार करजगीला रेल्वे खात्याकडून जागेची नुकसान भरपाई मिळणार आहे. डॉ.संदीप आडके यांनी खोट्या कागदपत्रे व शिक्याद्वारे खोट्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी खोट्या आहेत.
दि. 27 जानेवारी रोजी डॉ. संदीप आडके व जुनी मिल ट्रस्टच्या अनेक ट्रस्टी व सभासदांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बदनामी बद्दल कुमार करजगीवर व खोट्या बातम्या लावल्याबद्दल आयटी कायद्या अंतर्गत संबंधित प्रसारमाध्यमांवर तात्काळ कारवाई करावी, दि. 5 जानेवारी 2026चे पोलीस आयुक्तालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावेत व सांभाळून ठेवावेत , कुमार करजगी वर जामीन रद्द होईपर्यंत स्थानबद्धतेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जुनी मिल जागेच्या भूखंड घोटाळ्यामध्ये कुमार शंकर करजगी व त्याचा साथीदार सुरेंद्र कर्णिक हे 2017 सालापासून माननीय उच्च न्यायालयाच्या काही अटी व शर्तीवर जामिनावर बाहेर आहेत व यातील सर्व जामीन अटी कुमार करजगीने मोडल्यामुळे त्याला 11 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाने लेखी हमीपत्रावर सक्त ताकीद दिलेली होती. यावर कुमार करजगी दोन्ही जागेचे खोटे व्यवहार करीत आहे तेथे कोणतेही अधिकार नसताना सर्कस, फूड फेस्टिवल, एक्जीबिशन ,लग्नकार्य, होर्डिंग लावणे बेकायदेशीर जागा वापरण्यास देणे व विकणे असे प्रकार राजरोस करत आहे. कुमार करजगी व त्याच्या सर्व संचालक मंडळाला या भ्रष्टाचाराबद्दल आमच्या ट्रस्ट मधून 2006 ला धर्मादाय आयुक्तांनी कायमस्वरूपी बरखास्त केलेले आहे व त्यावर या जागेचे कोणतेही व्यवहार करायचे नाहीत असे 2001 पासून विविध कोर्टांचे आदेश आहेत.जुनी मिल जागेशी कुमार करजगी अथवा इतर कोणाचाही आमची ट्रस्ट सोडता संबंध नाही. जुनी मिलची सर्व 137 एकर जागा ही धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद आहे.
जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे सचिव डॉ. संदीप आडके यांना त्याने धर्मादाय आयुक्त कार्यालय मध्ये 29 डिसेंबर 2025 रोजी चक्क न्यायाधीशांसमोरच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तेथे पोलिसांना पाचारण करावे लागलेले होते. कुमार करजगी च्या विरुद्ध मागील अनेक वर्षात डॉ. संदीप आडके व ट्रस्टच्या सभासदांनी पोलिसांकडे व सरकारी खात्यांकडे तक्रारी करून सुद्धा कुमार करजगी याने पोलिसांची व अनेक सरकारी खात्यांशी संगनमत केल्याने त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हा इसम माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अस्थिरोगतज्ञावर खंडणी सारखे गलिच्छ आरोप करीत आहे. त्यामुळे माझी व माझ्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर नाहक बदनामी झालेली आहे. कुमार करजगी दररोज अनेक गंभीर गुन्हे करीत आहे त्यामुळे हा इसम समाजात राहण्याच्या लायकीचा नसल्यामुळे त्यावर तात्काळ स्थानबद्धता अथवा तडीपारीची कारवाई करावी व त्याचा जामीन रद्द करण्याची पुन्हा एकदा कोर्टामध्ये कारवाई सुरू करावी अशी लेखी मागणी डॉ. संदीप आडके यांनी पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे व या सर्व मागण्यांना पोलिस आयुक्तांनी तत्वता मान्यता दिलेली आहे . कुमार करजगीने डॉ.आडके यांच्याविरुद्ध आतापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल केलेली नाही हे सुद्धा स्पष्ट केले आहे.
कुमार करजगीने 1988 साली सदर ट्रस्ट स्थापन करून सोलापुरातील अकराशे सभासदांकडून कोट्यावधी रुपये ट्रस्टच्या नावे कोर्टात भरून सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड ,कंबर तलावाजवळील मोतीबाग ,उमा नगरी, जुनी पोलीस लाईन, मोरारजी पेठ अशा पाच ठिकाणच्या 137 एकर जागा 1996 ते 98 दरम्यान ट्रस्टच्या नावे मोजणी करून कोर्ट रिसीव्हर कडून ताब्यात घेतल्यानंतर नगर भूमापन कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुमार करजगिने त्या जागेवर बोगस उमा सहकारी संस्थेचे नाव चढवलेले होते व त्यानंतर संस्थेच्या सभासदांना आज पर्यंत त्याने कोणतेही कायदेशीर प्लॉट वाटप केले नाही व तो तसे करू पण शकत नाही.सर्व जागा धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय खोट्या कागदपत्रांवर विकल्या. या संघर्षामध्ये ही जागा जुनी मिल मधील बेकार कामगार व त्यांच्या वारसदारांसाठी घेतली आहे असे कोर्टामध्ये खोटे दाखवून त्यावरील व्याज माफ करून घेतले व येथील गरीब कामगारांना मी येथे फुकट घर बांधून देतो या खोट्या आशेवर गेले 35 वर्ष त्यांचा गैरवापर केलेला आहे एवढेच नव्हे तर अनेक जणांकडून या जागेसाठी उमा सहकारी पतसंस्थेमध्ये अनधिकृतपणे पैसे भरून घेतलेले आहेत. मिल कामगारांचे खोटे अंगठे घेऊन त्यांच्या परताव्यातील पैसे सुद्धा कुमार करजगीने हडपलेले आहेत. नुकत्याच बंद पडलेल्या समर्थ सहकारी बँकेमध्ये आमच्या ट्रस्टच्या अनेक सभासदांकडून प्रत्येक प्लॉट साठी 25000 रुपये डेव्हलपमेंट चार्जेस भरून घेतलेले होते व त्यानंतर कुमार करजगी या संस्थेचा चेअरमन झाला व आमच्या संस्थेची जागा त्याने या बँकेत खोट्या पद्धतीने तारण ठेवून स्वतः व स्वतःच्या मुलाबाळांच्या नावे कोट्यावधी रुपयाचे कर्ज उचलल्यामुळे ही बँक बुडली आहे.
137 एकर चा हा एवढा मोठा हजारो कोटींचा भूखंड घोटाळा केवळ चौथी शिकलेल्या कुमार करजगीला शक्य नव्हता त्यामध्ये सुरुवातीपासूनच सोलापुरातील अनेक डॉक्टर, मीडियामधील लोक ,एडव्होकेट ,सीए व काही राजकीय लोकांनी अतिशय पद्धतशीरपणे षडयंत्र करून रचलेला हे एक 'व्हाईट कॉलर ऑर्गनाइज्ड स्कॅन्डल' आहे. त्यामध्ये कुमार करजगीला न्यायालयातील न्यायाधीश, नगर भूमापन कार्यालय, सोलापूर महानगरपालिका व पोलीस खात्यातील अनेक लोकांनी भ्रष्टाचाराने व अनैतिक मार्गाने मदत केल्यामुळे हे शक्य झालेले आहे. आज सुद्धा आमच्या तक्रारींवर पोलीस खात्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही व त्याचमुळे हा अट्टल गुन्हेगार आमच्ये चारित्र्य हनन करीत आहे. कुमार करजगीवर जर येत्या आठ दिवसांमध्ये पोलिसांकडून कोणतेही सक्त कारवाई झाली नाही तर पुढे हे प्रकरण राष्ट्रपती व सरन्यायाधीशांपर्यंत नेणार आहे. 35 वर्षे कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणारा गुन्हेगार राजरोसपणे बाहेर फिरून आमच्यासारख्या डॉक्टरांचे चारित्र्यहनन करीत असेल व त्रास देत असेल, आपल्या पोलीस आयुक्तालयातच खंडणी मागितली जात असेल तर आपले ग्रह खाते काय करत आहे ? त्यामुळे या गोष्टीची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
कुमार करजगीने केलेल्या भ्रष्टाचार व फसवणुकीचा अंत जवळ आलेला आहे त्यामुळेच तो असे खोटे आरोप करीत आहे. परंतु त्यातून कुमार करजगी, त्याचे नातेवाईक त्याचे सर्व सहकारी व त्यांना या जुनी मिल भूखंड घोटाळ्यात ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांना सक्त शासन दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
हा विषय फक्त आमच्या जुनी मिल ट्रस्टचा व त्यांच्या सभासदांचा आहे त्यामध्ये आम आदमी पार्टी व इतर कोणत्याही राजकीय पक्षांचा काडीमात्र संबंध नाही, त्यांनी त्याची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये.
जुनी मील जागेच्या नावे ज्या कामगारांची व लोकांची कुमार करजगी व त्याच्या हस्तकांनी आजपर्यंत फसवणूक केली आहे त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment