Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, January 25, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर जिल्हा परिषद बागेत साप्ताहिक यश संघर्षचे संपादक सादिक शेख यांचा वाढदिवसानिमित्त अप्पासाहेब मित्रपरिवार कडून भव्य सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब, पीडित व वंचित नागरिकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणारे, तसेच अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराच्या विरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे पत्रकार सादिक शेख यांचा वाढदिवस सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

साप्ताहिक ‘यश संघर्ष’ मराठी वृत्तपत्र व सोलापूर नामा 24 न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सादिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पा श्री मित्रपरिवार यांच्या वतीने शाल व पुष्पहार व सन्मानाची टोपी देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.



या प्रसंगी विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, संपादक, तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सादिक शेख यांच्या निर्भीड पत्रकारितेचे, सामाजिक बांधिलकीचे व जनहितासाठी केलेल्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना सादिक शेख यांनी, “पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा माझा प्रयत्न कायम सुरू राहील,” असा निर्धार व्यक्त केला.


हा कार्यक्रम सामाजिक सलोखा, पत्रकारिता आणि जनहिताच्या लढ्याचे प्रतीक ठरला असून, सोलापूरच्या पत्रकारितेतील एक प्रेरणादायी क्षण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. 

यावेळी आप्पासाहेब लंगोटे,नितीन करजोळे, लतीफ नदाफ,अनिल शिराळकर,सिद्धाराम नंदर्गी, विजयकुमार उघडे, अस्लम नदाफ, गिरमल्ला गुरव, विश्वनाथ होनकुरे, इन्नूस आत्तार, अकबर शेख, सुरज रजपुत, सिध्दू पुजारी, सोहेल जागीरदार, अश्फाक शेख, नरेन सब्बन, बालाजी नल्ला उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या अखेर सादिक शेख यांनी सर्वांचे आभार व्यक्त केली.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment