सारा न्यूज नेटवर्क -
जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई..!
दुचाकी अन् ७ मोबाईलसह सराईत चोरटा जेरबंद, दोन गुन्हे आले उघडकीस
सोलापूर ( प्रतिनिधी) :- जेलरोड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका चोरट्बाला ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जेलरोड पोलिस ठाण्याचे तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील व त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रवीण मोहन कंदिकटला (वय ३५, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर) यास वल्याळ क्रीडांगण परिसरातील सार्वजनिक रोडवरून दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या जवळील पिशवीमध्ये विविध कंपन्यांचे एकूण सात मोबाइल मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची आणि मोबाइलची कागदपत्रे व अभिलेखाची पडताळणी केली असता जेलरोड पोलिस ठाण्यातील दोन गुन्है उघडकीस आले आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलिस उपायुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील आणि पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील शरीफ शेख, पोलिस हवालदार वहाब शेख, धनाजी बाबर, स्वप्निल इंगळे पोलिस नाईक उमेश सावंत, इकरार जमादार, किशोर व्हाणगुंटी, संतोष वायदंडे आणि विठ्ठल जाधव यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल धनाजी बाबर करीत आहेत.

No comments:
Post a Comment