सारा न्यूज नेटवर्क -
हैदराबाद ,बेंगलोर व तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय -९१ चे एमडी मनोज चाको यांची सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी थेट गोवा हेडक्वार्टर मध्ये जाऊन घेतली भेट.
पणजी: - सोलापुरातून लवकरच हैदराबाद, बेंगलोर व तिरुपती साठी फ्लाय -९१ कंपनीची विमानसेवा सुरू करण्याबाबत कंपनीचे एमडी व सीईओ श्री मनोज चाको यांच्याशी चर्चा करण्यासाठी सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके व डॉ. डायना आडके यांनी कंपनीच्या गोव्यातील हेडक्वार्टर येथे जाऊन दि. १५.०१.२०२६ रोजी भेट घेतली. कंपनीने नुकतेच दोन ए टी आर- ७२ विमाने घेतली आहेत व आपल्या विमानसेवेचा विस्तार करीत आहेत या संधीचा फायदा घेऊन सोलापूरसाठी अपेक्षित असणाऱ्या वरील विमानसेवेसाठी डॉ.आडके यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. परंतु ही विमानसेवा केवळ उडान योजनेअंतर्गतच शक्य असल्याचे मनोज चाको यांनी स्पष्ट केले.
सोलापूर विचार मंचने २०१९ पासून सिद्धेश्वर कारखान्याची अनधिकृत चिमणी हटवण्यासाठी न्यायालयीन व प्रशासकीय लढा देऊन १५ जून २०२३ रोजी चिमणी हटवली व त्यानंतर जून २०२५ मध्ये फ्लाय-९१ कंपनीची सोलापूर ते गोवा ही पहिली विमान सेवा सुरू करून दाखवली. मनोज चाको हे सोलापूरच्या विमानसेवे बाबत अतिशय सकारात्मक असून डॉ. संदीप आडके यांनी सोलापुरातील पारंपरिक टॉवेल व चादरीचा व्यापार, रेडिमेड गारमेंट व मेडिकल हब व धार्मिक पर्यटनामुळे विमान सेवेस चांगला प्रतिसाद मिळेल याची हमी दिली. सध्या सुरू असलेल्या सोलापूर -गोवा विमान सेवेस सोलापूर व गोव्यातील लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे परंतु ही विमानसेवा लोकांना व कंपनीस परवडण्यासाठी उडान योजना अथवा व्ही जी एफ फंडा अंतर्गत देणे अत्यंत गरजेचे आहे.
डॉ. संदीप आडके यांनी सोलापूरची विमान सुरू करण्यासाठी डीजीसीए,एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ,पंतप्रधान कार्यालय, नागरी उद्य्ययन मंत्रालय या सर्वांशी सातत्याने संपर्क करून गोवा व मुंबईच्या विमान सेवा सुरू केलेल्या आहेत.परंतु सोलापुरातून अजूनही उडान योजने अंतर्गत या सेवा उपलब्ध नाहीत. सोलापूरला लवकरात लवकर उडान योजना कार्यान्वित झाली नाही तर नवीन विमानसेवा येणे अवघड आहे व सध्याच्या गोवा व मुंबईच्या विमानसेवा सुद्धा बंद पडण्याची शक्यता उद्भवू शकेल असे मत या चर्चे नंतर डॉ. संदीप आडके यांनी व्यक्त केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment