सारा न्यूज नेटवर्क -
अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघाचा पद नियुक्ती सोहळा कल्याण येथे उत्साहात संपन्न!
मोहन चंदू राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
कल्याण (प्रतिनिधी) : - अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी कल्याण येथील रेस्ट हाऊस येथे पद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोहन चंदू राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मंगलजी डोंगरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी आणि संघटनेची भविष्यातील वाटचाल यावर मार्गदर्शन करण्यात आले.
नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन चंदू राठोड यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. सदर कार्यक्रमात उपस्थित असलेले पत्रकारांची नावे खालील प्रमाणे:- श्री. मंगलजी डोंगरे संस्थापक अध्यक्ष श्री.बाळासाहेब कांबळे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ) सौ .सारिका शिंदे ( महिला प्रदेशाध्यक्ष) श्री.संतोष चव्हाण ( कायदेशीर सल्लागार) श्री. शरद घुडे ( महाराष्ट्र सचिव) श्री. सचिन बुटाला ( कार्याध्यक्ष) श्री. ताबे , अमर शिंदे व इतर पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित पत्रकार बांधव आणि मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





No comments:
Post a Comment